वैयक्तिक आरोप करून जरांगेंनी मराठा आंदोलनाची दिशा बदलू नये, लोकांचा विश्वास गमावू नये; बच्चू कडूंचा इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बामणी कावा किंवा विष प्रयोगाची भाषा वापरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा बदलू नये, असा गंभीर इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिला. मराठा आंदोलन उभे राहण्यासाठी मनोज जरांगे यांनी खूप कष्ट केले आहेत, ते केवळ वैयक्तिक आरोपापोटी वाया जाऊ नयेत. आंदोलनाला घातक वळण लावू नये, असे बच्चू कडू म्हणाले.The Jarangs should not change the direction of the Maratha movement by making personal accusations, should not lose the faith of the people; A warning of bitter children

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी स्टेजवरच मोठे नाट्य घडवून अचानक खवळून देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले. मी इथून उठून मुंबईत तुमच्या सागर बंगल्यावर येतो तुम्ही मला गोळ्या घाला. माझा जीव घ्या, असे मनोज जरांगे म्हणाले. पण शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, उद्धव ठाकरे हे ज्या भाषेमध्ये देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतात, त्याच भाषेत मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर तेच आरोप केले. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या वळणाविषयी आता संपूर्ण महाराष्ट्रात दाट संशय तयार झाला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांना सबुरीचा सल्ला दिला.



बच्चू कडू म्हणाले, मनोज जरांगेंनी मराठा आंदोलनासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. या आंदोलनाला वेगळे वळण लागावे यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. मोठ्या आंदोलनाबाबत असे घडतच असते. त्याला मात्र त्यांनी बळी पडू नये. गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे, हे कायम लक्षात ठेवावे.

फडणवीसांवरील आरोप करून जरांगे मुंबईकडे रवाना झाले आहे. यावर बच्चू कडू म्हणाले, कुणा एका व्यक्तिवर वैयक्तिक आरोप करून आंदोलनाची दिशा बदलली, तर ते चुकीचेच होईल. आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. त्यांनी एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये. खूप महिन्यांची मेहनत आणि करोडो लोकांचा विश्वास वाया जाण्याची शक्यता आहे. आंदोलनाला वेगळी दिशा देण्यासठी काही शक्ती काम करत असतील, तर त्याला बळी पडू नये. आता त्यांनी मुंबईकडे जाऊ नये. त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा. लोकांचीही तीच मागणी आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो. असे शक्तीला बळी पडून निर्णय घेतल्याने समाजावर परिणाम होईल. त्यांच्या मोठ्या मेहनतीवर पाणी फिरू नये, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, असेही कडू म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे. या आरोपांवर बच्चू कडू म्हणाले, मनोज जरांगे यांनी अशी कुठलीच वक्तव्य करून वेगळी भूमिका घेऊ नये. सरकारला सर्वांचाच जीव महत्वाचा असतो. मग तो जरांगे पाटलांचा असो, वा देवेंद्र फडणवीसांचा. आपण जीव घेण्यासाठी आणि देण्यासाठी आंदोलन केलेले नाही. यावर चांगला मार्ग कसा काढता येईल. यावर दोन दिवसांत चर्चा करू. आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी आता मोठी उंची गाठलेली आहे. त्यांच्यावर करोडो लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी भावनिक होऊन घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले जरांगे??

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला डॉक्टर किंवा पोलिसांकरवी मारण्यासाठी प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटालांनी केला. फडणवीसांना मराठा समाजाला मोठे होऊ द्यायचे नाही, त्यासाठीच बारस्करांच्या माध्यमातून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटते की हे शेतकऱ्याचे कालचे पोर मराठ्यांचा नेता होऊ पाहत आहे. मला नेत्या होण्याची हौस नाही, मराठा या नात्याने गोरगरीब लोकांसाठी मी आंदोलन करतोय. तुम्हाला माझ्या बळी हवाच असेल तर मीच तुमच्या सागर बंगल्याकडे येतो, घाला मला गोळ्या. पण मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा देत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रावाना झाले आहेत.

The Jarangs should not change the direction of the Maratha movement by making personal accusations, should not lose the faith of the people; A warning of bitter children

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात