जरांगेंची भाषा “राजकीय”, ठाकरे – पवारांच्या स्क्रिप्टनुसारच जरांगे बोलतात!!; शिंदे – फडणवीसांचे संयमी, पण ठाम प्रत्युत्तर!!

Shinde - Fadnavis' moderate, but firm reply

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या बेछूट आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयमी पण ठाम भाषेत प्रत्युत्तर दिले. “सागर” बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामानिमित्त “सागर” बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक नाही. मात्र, मनोज जरांगे कोणत्या निराशेतून ते बोलत आहेत, त्यांना कोणती सहानुभूती हवे आहे ते माहिती नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. Shinde – Fadnavis’ moderate, but firm reply

मी मराठा समाजासाठी काय केले??, असा सवाल ते करतात, पण मी सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवले. त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, पवार साहेब बोलत होते, तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलत आहेत?? हा प्रश्न आहे. काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही तो मुद्दा योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10 % आरक्षण देऊन शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. राज्यात गुंतवणूक देखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली. 

जरांगेंनी वेळोवेळी मागण्या बदलल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जरांगे पाटील प्रामाणिक भावना मनात ठेवून या लढ्यात उतरले आहेत अशी आमची पूर्ण भावना होती. मग शिंदे कमिटी केली, त्यानंतर सरसकटची मागणी आली. यानंतर राज्यात व्याप्ती वाढवली. नंतर सगेसोयरे मागणी आली. आता ओबीसी मधून द्या म्हणाल्याने वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून भेटायला गेलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा 56 आंदोलने मराठा मोर्चे निघाले. त्यावेळी कोणालाही तेव्हा त्रास झाला नाही. यावेळी मात्र दगडफेक, आग लागली. गालबोट लावण्याचे काम कोण करत आहे, तरुणांनी सावध राहिले पाहिजे, असा स्पष्ट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठी भावना होती तेव्हा मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो. आता मात्र त्यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्याच्या बोलण्यातून राजकीय वास येत आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही. हे त्यांना कोणी बोलायला लावतं का? हे पाहावं लागेल. महाराष्ट्र हे सहन करत नाही, असा इशाराही शिंदे – फडणवीस यांनी दिला.

Shinde – Fadnavis’ moderate, but firm reply

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात