मुंबईतील डबेवाल्यांना एचएसबीसी बॅँकेचा मदतीचा हात, कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने १५ कोटी रुपयांची मदत


थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता मुंबईतील चाकरमान्यांना डबे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या  डबेवाल्यांना एसएसबीसी बॅँकेने मदतीचा हात दिला आहे. कोरोना महामारीमुळे व्यवसाय बंद पडल्याने १५ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.HSBC Bank’s helping hand to Mumbai Dabewalas , Rs 15 crore help as business closed due to corona


विशेष प्रतिनिधी

मुंबई : थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता मुंबईतील चाकरमान्यांना डबे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांना एसएसबीसी बॅँकेने मदतीचा हात दिला आहे. कोरोना महामारीमुळे व्यवसाय बंद पडल्याने १५ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

एसएसबीसी बॅँकेने दिलेल्या माहितीनुसार, डबेवाल्यांसाठी अन्नपुरवठा, विमा संरक्षण, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सहाय्य याचबरोबर दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर डबेवाल्यांसाठी नवीन सायकलीही घेऊन देण्यात येणार आाहेत.



मुंबईतील लोकल्स, व्यावसायिक इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी लगबगीने जाणारे डबेवाले दिसणे हे आत्तापर्यंत नेहमीचे दृश्य होते. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे मुंबईतील डबेवाले गेल्या वर्षी मार्चपासून बसून आहेत. त्यांच्या हाताला काम नाहीत. त्यामुळे ही मदत केली जाणार असल्याचे बॅँकेने म्हटले आहे.

मुंबईतील डबेवाल्यांचे नेटवर्क हे अत्यंत सुबक आहे. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची जगातील मोठमोठ्या विद्यापीठांनी अभ्यास केला आहे. मुंबईतील चाकरमान्यांसाठी दुपारचे जेवण पुरविण्याचे काम ते करतात. एखाद्याच्या घरातून डबा घेऊन सायकलवरून नेला जातो.

लोकलच्या लगेज डब्यात तो पोहोचविला जातो. तेथून नियोजित ठिकाणी पोहोचल्यावर पुन्हा दुसरा डबेवाला सायकरलवून संबंधित नोकरदारापर्यंत पोहोचविला जातो. ही सगळी व्यवस्था अशा पध्दतीने असते की कोठेही डबा गहाळ होत नाही किंवा पोहाचविण्यासाठी विलंब होत नाही.

एचएसबीसी बॅँकेचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी हितेंद्र दवे म्हणाले, मुंबईतील डबेवाले मुंबईची शान आहेत. मुंबईतील चाकरमान्यांना घरचे अन्न पोहोचविण्याचे काम ते करतात. परंतु, कोरोना महामारीमुळे त्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे बॅँकेने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.एचएसबीसी बॅँक युनायटेड वे मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत डबेवाल्यांपर्यंत ही मदत पोहोचविणार आहे. त्यामुळे या कठीण काळात डबेवाल्यांचे जगणे सुसह्य होणार आहे.

HSBC Bank’s helping hand to Mumbai Dabewalas , Rs 15 crore help as business closed due to corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात