प्रतिनिधी
सोलापूर : उजनी धरणातील पाणी लिंबोडी योजनेच्या नावाखाली बारामतीला नेण्याचा पवार कुटुंबियांचा डाव असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी संजय पाटील घाटणेकर यांनी करून महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. How perennial water cut drought
उजनी धरणाचे पाणी लिंबोडी योजनेतून बारामती आणि इंदापूर तालुक्यातील काही गावांना देण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारने घातला आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड अस्वस्थता असून उजनी पाणी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. याच नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी संजय पाटील घाटणेकर यांचाही समावेश आहे. संजय पाटील घाटणेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने करमाळा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती.
उजनीचे पाणी लिंबोडी योजनेमार्फत काटेवाडीत नेण्याचा डाव असल्याचा आरोप संजय पाटील घाटणेकर आणि उजनी पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. काटेवाडीला बारमाही पाणी मिळते. परंतु काटेवाडी ही दुष्काळी असल्याचा दाखला तिथल्या तहसीलदारांच्या सहीनिशी दाखल करण्यात आला आहे. त्यावरची तारीख 31 जानेवारी 2022 आहे. हा दाखला संजय पाटील घाटणेकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केला.
उजनीच्या पाण्यावर चालणाऱ्या योजनांना सोलापूर जिल्ह्यात एक रुपयाही मिळत नाही. परंतु, लिंबोडी योजनेला 346 कोटी रुपये कसे मिळाले?, असा सवाल देखील घाटणेकर यांनी केला.
लिंबोडी योजनेतून बारामती आणि इंदापूर तालुक्यातील काही गावांना पाणी देण्याची घोषणा ठाकरे पवार सरकारमधील मंत्री दत्तामामा भरणे यांनी केली होती. मात्र, या घोषणेला सोलापूर जिल्ह्यातून प्रचंड विरोध होतो आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी असणाऱ्या संजय पाटील घाटणेकर यांनी कागदपत्रांसह थेट पवार कुटुंबियांचे गावात असणाऱ्या काटेवाडीच्या दुष्काळी परिस्थितीवर झगझगीत प्रकाश टाकला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App