अमित शहांच्या दौऱ्यावर बिहारमध्ये हायअलर्ट, स्टिंगर मिसाईलच्या अटॅकची भीती; कडेकोट सुरक्षेचे निर्देश


वृत्तसंस्था

पाटणा : भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बिहार दौऱ्यावर आहेत. शहा यांच्या दौऱ्यापूर्वी बिहारमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. एडीजी सिक्युरिटीने अलर्ट जारी केला आहे. या अंतर्गत पाटणाव्यतिरिक्त बेतिया आणि बगाहा पोलिसांना विशेष सतर्क करण्यात आले आहे.High alert in Bihar on Amit Shah’s visit, fear of Stinger missile attack; Strict safety instructions

या जिल्ह्यांच्या एसपींसह आयजी, डीआयजी आणि विभागीय आयुक्तांना अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



हॉटेल- बस स्टँड- वाहनांची तपासणी

गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे पत्र एडीजी सिक्युरिटीने जारी केले आहे. जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, दहशतवाद्यांकडे लांब पल्ल्याच्या स्टिंगर क्षेपणास्त्रांच्या उपलब्धतेमुळे व्हीव्हीआयपींना धोका वाढला आहे. हे पाहता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बिहारमध्ये येणाऱ्या कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी.

याअंतर्गत शुक्रवारी सायंकाळपासूनच पाटणा आणि पश्चिम चंपारणमधील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. हॉटेल, बसस्थानक, स्थानके याशिवाय वाहनांचीही सखोल तपासणी केली जात आहे. सुरक्षा दलांकडून संशयास्पद वस्तूंवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

हेलिपॅडवर विशेष बंदोबस्त, ध्वज बॅनर लावण्यावर बंदी

एडीजी (सुरक्षा) यांना गृहमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत हेलिपॅडजवळ जमलेल्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी विमानतळ आणि हेलिपॅडभोवती मजबूत बॅरिकेडिंग तसेच दंडाधिकार्‍यांची प्रतिनियुक्ती लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसाठी पुरेशा संख्येने फौजफाटा तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पाटणा आणि वाल्मिकीनगर येथील हेलिपॅडवर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. हेलिपॅडजवळ कोणतेही ध्वज बॅनर लावण्यास बंदी आहे.

असे आहे अमित शहांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक

गृहमंत्री शनिवारी दुपारी 12.10 वाजता हेलिकॉप्टरने लॉरिया येथील साहू जैन हायस्कूलच्या मैदानावर उतरतील. बैठक 12.15 वाजता सुरू होईल. दुपारी 1.52 वाजता ते लॉरियातील नंदनगढ येथील बौद्ध स्तूपासाठी रवाना होतील. येथून किसान भवन येथे दुपारी 2.10 ते 3 या वेळेत पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक होणार आहे. 3.10 वाजता ते साहू जैन हायस्कूल येथून हेलिकॉप्टरने पाटण्याला रवाना होतील. दुपारी 4.10 वाजता पाटणा येथील बापू सभागृहात आयोजित स्वामी सहजानंद सरस्वती जयंती सोहळ्यासह किसान-मजदूर समागमाला गृहमंत्री उपस्थित राहतील. यानंतर ते सायंकाळी 6.25 वाजता पाटणा शहरातील गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतील. तेथून ते 7.25 वाजता शासकीय अतिथीगृहात जातील. तेथे बिहार भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील.

High alert in Bihar on Amit Shah’s visit, fear of Stinger missile attack; Strict safety instructions

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात