शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदेसह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची उपस्थिती
विशेष प्रतिनिधी
शिवजयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.Government is always committed to preserve the history of Shiv Chhatrapati Chief Minister Shinde
यावेळी प्रथेप्रमाणे शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. तसेच यानंतर बाल शिवाजी राजांची वाजत गाजत पालखी काढण्यात आली. तसेच किल्ल्यावर शिवाजी महाराजांची महती कथन करणारे पोवाडे, नाटकं यांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, ‘अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात साजरी होत असते. पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिव छत्रपती म्हणजे युगपुरुष आणि युगप्रवर्तक राजे होते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केले.’ असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
याशिवाय, ‘शिवछत्रपतींचा इतिहास जतन करण्यासाठी शासन कायम कटिबद्ध आहे. किल्ले रायगडाप्रमाणे किल्ले शिवनेरीचा देखील विकास करण्यात येत आहे. या पट्ट्यातील तीर्थक्षेत्र जोडण्याबाबत विचार होईल. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या हिरडा पिकांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन घेण्यात येत असल्याचेही आवर्जून नमूद केले.’ असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App