भाजपची रणनीती : चिरा चिरा हा फोडावा, बालेकिल्ला बांधावा!!

BJP strategically manoeuvring splits in opposition parties for increasing its vote percentage

2024 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना आणि अगदी तोंडावर येण्यापूर्वी महाराष्ट्रासह देशात प्रसार माध्यमे INDI आघाडीचे ढोल पिटत असताना देखील भाजपने “चिरा चिरा हा फोडावा, बालेकिल्ला बांधावा” हीच रणनीती स्वीकारली होती. आत्ता रणनीतीची फळे लोकांसमोर येत आहेत.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यापासून जयंत पाटलांपर्यंत अनेक नेते भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले आहेत किंवा येणार आहेत. कमलनाथ मध्य प्रदेशातल्या 23 काँग्रेस आमदारांचा पुतण्याच्या बेतात आहेत. तो आकडा जमला की कमलनाथ कमळाच्या आश्रयाला येणार आहेत, तरी देखील भाजप मधले इन्कमिंग अद्याप थांबलेले नाही आणि ते थांबण्याची शक्यताही दिसत नाही. अगदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देखील भाजपच्या संपर्कात आल्याची बातमी भाजपप्रेमी रिपब्लिक टीव्हीने दिली होती. अभी कितनी शिकार करोगे??, असा सवाल खर्गेंनी मोदींना विचारल्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती.

पण मूळात हे असे का घडते आहे किंवा का घडविले जाते आहे?? याचेच उत्तर “चिरा चिरा हा फोडावा, बालेकिल्ला बांधावा!!” या शीर्षकातून दिसते. हे उगाच भाजपचे ढोल पिटण्यासाठी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व कौशल्याची अफाट स्तुती करण्यासाठी दिलेले शीर्षक नाही, तर ते भाजप सध्या अवलंबत असलेल्या खऱ्या रणनीतीचेच निदर्शक आहे.

निवडणुकीची रणनीती नेमकी आखायची सोडून लंब्याचवड्या यात्रा पायी चालून किंवा केवळ माध्यमांमधल्या चर्चेत राहून किंवा सोशल मीडियावर चमकोगिरी करून पक्षाची वेगवेगळ्या स्तरांवर बांधणी करता येत नाही, पण तशी बांधणी करण्याचे काम महाराष्ट्रातले “चाणक्य” आणि त्यांचे शिष्य “चंद्रगुप्त” करत असतात. माध्यमांमध्ये ते धकून जाते, पण म्हणून त्यांचे पक्ष टिकवून ठेवू शकलेत असे घडलेले नाही.

उलट माध्यम निर्मित “चाणक्य” आणि “चंद्रगुप्तां”चेच पक्ष सगळ्यात आधी फुटले. त्यांनीच घडवलेले नेते भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेले आणि ते इथून पुढेही जाणार आहेत. कारण आपापल्या नेत्यांना आणि अनुयायांना काही देण्यासारखे गांधी – ठाकरे – पवारांकडे उरलेलेच नाही ही खरी वस्तुस्थिती आहे. त्या उलट भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेल्याने स्वतःची राजकीय भूक भागण्याची खात्री “वळचणवीर” नेत्यांना आहे.

एकनाथ शिंदे काय, अजित पवार काय किंवा अशोक चव्हाण काय यांच्या मूलभूत राजकीय ताकदी फार मर्यादित आहेत. त्यांची प्रभावक्षेत्रे देखील विशिष्ट जिल्ह्यांपुरती, शहरांपुरती मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आणून बसून गांधी – ठाकरे – पवारांच्या बालेकिल्लातला एक एक चिरा फोडून त्या चिऱ्यांमधूनच आपला बालेकिल्ला उभारण्याचे काम भाजपचे रणनीतीकार करत आहेत.

वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांच्या मतांची टक्केवारीची बेगमी 5 – 7 % पलीकडे नाही. पण ती जेव्हा भाजपच्या मूळ मतांच्या टक्केवारीमध्ये बेरजेच्या रूपात येते, त्यावेळी भाजपच्या एकूण मतांची बेरीज टक्केवारीची बेरीज एवढी वाढते की ती 2/3 पर्यंत जाऊन ठेपते आणि नेमके हेच भाजपला लोकसभेच्या प्रत्येक जागेवर साध्य करायचे आहे. मग त्यासाठी ते मनसेसारख्या छोट्या पक्षालाही आपल्याच वळचणीला आणून बसवण्याची वाट बघत आहेत. फडणवीस – बावनकुळे – शेलार हे नेते याच कामांमध्ये विशेषत्वाने मग्न आहेत.

देशभरातल्या प्रत्येक राज्यामध्ये असे भाजपचे “पॉईंट मेन” कार्यरत आहेत. जिथे – जिथे म्हणून विरोधी पक्षांमध्ये “लुपहोल्स” आहेत, ती सगळी आपल्या कामी उपयोगी आणण्यासाठी विविध स्तरांवर काम सुरू आहे. मग तामिळनाडूतल्या एका माजी खासदाराबरोबर 17 माजी आमदार भाजपमध्ये एकदम सामील करणे असो किंवा केरळमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे माजी जिल्हा आणि तालुका अध्यक्ष भाजपच्या गळाला लावणे असो, हे मतांच्या टक्केवारीतले बेरजेचे राजकारण आहे आणि हेच राजकारण साध्य करण्यासाठी भाजपचे “पॉईंट मेन” कामाला लागले आहेत.

यात काही रणनीती यशस्वी होईल, काही अयशस्वी होईल, याचीही भाजपच्या नेतृत्वाला निश्चित जाणीव आहे. पण अपयशाच्या भीतीने मतांच्या आणि जागांच्या टक्केवारीचे टार्गेट कमी ठेवणे भाजपच्या नेतृत्वाला बिलकुल मान्य नाही. मतांची टक्केवारीचे टार्गेट भरपूर ठेवल्याने त्या दिशेने काम करता येईल. पण ती थोडीफार घसरली फार बिघडणार नाही, अशी ही रणनीती आहे. म्हणजेच 50 % पेक्षा जास्त मतांचे टार्गेट ठेवले काम केले आणि तरीही मतांची टक्केवारी 45 % आसपास राहिली, तरी भाजपचे फारसे काही बिघडणार नाही. उलट तो फार मोठा लाभ ठरणार आहे. कारण आज पर्यंत काँग्रेस देखील पक्ष संघटनेच्या सर्वोच्च काळात 50 % मतांपर्यंत पोहोचलेला पक्ष नाही. काँग्रेसला फक्त एकदाच 1984 च्या म्हणजेच इंदिरा लाटेतल्या निवडणुकीत 46.86 % पटे मिळाली होती. ही काँग्रेसची सर्वोच्च टक्केवारी होती. त्यामुळे भाजपने 50 % मतांचे टार्गेट ठेवून 45 % मते मिळवणे ही देखील फार मोठी कामगिरी ठरणार आहे.

त्यामुळे भाजपने 370 स्वबळावर आणि 400 पार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बळावर हे लोकसभेच्या जागांचे टार्गेट ठेवले, तेव्हाच मतांचे टार्गेट 50 % ठेवले आहे आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करताना पक्ष त्या टार्गेटच्या पलीकडे गेला, तर नेतृत्वाला आनंदच आहे. पण जरी तो त्या टार्गेटच्या आसपास राहिला किंवा अगदी थोडाफार खाली येऊन तो 45 % मतांच्या आसपास राहिला, तरी प्रत्यक्ष जागांमध्ये भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही 375 + राहील, याची भाजपच्या रणनीतीकारांना खात्री आहे.

याचाच अर्थ संसदेत लोकसभेत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही 2/3 बहुमत मिळू शकेल, जे खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे “नव्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी” आवश्यक असणारे बहुमताचे टार्गेट आहे!!

चिरे छोटे बालेकिल्ला मोठा

यासाठीच प्रत्येक राज्यांमध्ये छोटे-मोठे घटक पक्ष आपल्याला जोडून घेण्याचे काम भाजपचे “पॉईंट मेन” करत आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील, राज ठाकरे, मध्य प्रदेशात कमलनाथ, नकुलनाथ, तामिळनाडूतले माजी खासदार, माजी आमदार, केरळ मधले माजी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उत्तर प्रदेशातले समाजवादी पार्टीचे छोटे – मोठे पदाधिकारी, राज्यसभेचे उमेदवार भाजपमध्ये सामावून घेणे घेणे हे संघ परिवाराच्या सर्वांत मोठ्या स्कीम मधले “छोटे” घटक आहेत. म्हणजेच भाजपच्या मोठ्या बालेकिल्लातले ते “छोटे चिरे” आहेत. ते चिरे फोडून आणि घडवूनच भाजप आपला बालेकिल्ला बांधत आहे!! भाकरी फिरवण्याची नुसती चमकदार भाषा करणाऱ्या चाणक्यांच्या आकलना पलीकडले हे गणित आहे!!

BJP strategically manoeuvring splits in opposition parties for increasing its vote percentage

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात