संभलमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान
विशेष प्रतिनिधी
संभल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील संभल येथे कल्कि धामच्या पायाभरणी समारंभात पूजा केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम हे देखील उपस्थित होते.Kalki Dham will emerge as a great center of Indian faith PM Modi
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज उत्तर प्रदेशच्या भूमीतून भक्ती आणि अध्यात्माचा आणखी एक प्रवाह वाहू लागला आहे. आज आणखी एका पवित्र स्थळाचा पाया रचला जात आहे. मला भव्य कल्की धामची पायाभरणी करण्याचे सौभाग्य लाभले आहे. मला विश्वास आहे की कल्की धाम भारतीय श्रद्धेचे आणखी एक महान केंद्र म्हणून उदयास येईल.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज एकीकडे आपली तीर्थक्षेत्रे विकसित होत आहेत आणि दुसरीकडे शहरांमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधाही तयार केल्या जात आहेत. आज मंदिरे बांधली जात आहेत तर देशभरात नवी वैद्यकीय महाविद्यालयेही बांधली जात आहेत. कालचक्र फिरले आहे, आज एक नवे युग आपले दारात ठोठावत आहे, याचा पुरावा हा बदल आहे… म्हणून मी म्हणालो होतो ‘हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App