Gangster Lawrence brother गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोलला अमेरिकेत अटक; सलमानच्या घरावरील गोळीबाराचा मास्टरमाइंड

Gangster Lawrence brother

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल याला अमेरिकेत अटक झाल्याची बातमी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आली आहे. Gangster Lawrence brother

अनमोलवर सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणीही अनमोलचे नाव पुढे आले होते.

दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी अद्याप अटकेची पुष्टी केलेली नाही, परंतु गुप्तचर एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने दोन आठवड्यांपूर्वी अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.Gangster Lawrence brother

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याची जबाबदारी अनमोलने घेतली होती. यासोबतच पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातही त्याचे नाव समोर आले आहे.


Ajit Pawar मी शरद पवार साहेबांना सोडले नाही; निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवारांचे मोठे विधान


एनआयएने 10 लाखांचे बक्षीस ठेवले होते अलीकडेच, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईवर 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. एजन्सीने 2022 मध्ये नोंदवलेल्या 2 प्रकरणांमध्ये अनमोलविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीतही अनमोलचे नाव आहे.

2012 मध्ये अनमोलवर पहिला गुन्हा दाखल झाला होता लॉरेन्स टोळीतील भानू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनमोलवर 2012 मध्ये पंजाबमधील अबोहरमध्ये प्राणघातक हल्ला, मारहाण आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2015 पर्यंत पंजाबमध्ये अनमोलवर 6 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या देशभरात अनमोलवर 22 गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये खून, टार्गेट किलिंग, खंडणी, शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांचा समावेश आहे.Gangster Lawrence brother

सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानकडून AK-47 मिळत होती

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स गँग पुन्हा सलमान खानवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणी 1 जून रोजी नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स टोळीतील चार जणांना अटक केली होती. या सर्वांचा पनवेलमध्ये सलमानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट होता.

त्यासाठी त्याने पाकिस्तानातून एके-47सह अनेक शस्त्रे आयात करण्याची योजना आखली होती. तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तुलाने सलमानला मारण्याचाही लॉरेन्स टोळीचा डाव होता. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांचीही याच पिस्तुलाने हत्या करण्यात आली होती. गोरेगाव फिल्म सिटीसह सलमानच्या फार्म हाऊस आणि शूटिंगच्या अनेक ठिकाणांचीही रेकी करण्यात आली. वास्तविक, हे सर्व लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सोशल मीडिया ग्रुपशी संबंधित होते. याच गटातून सलमानला मारण्याची योजना आखली जात होती.

Gangster Lawrence brother Anmol arrested in US

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात