Ajit Pawar मी शरद पवार साहेबांना सोडले नाही; निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवारांचे मोठे विधान

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

बारामती : Ajit Pawar  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एका सभेत बोलताना अजित पवारांनी एक विधान केले होते. अजित पवार म्हणाले होते, काहींना वाटते की मी साहेबांना सोडायला नको होते. पण मी साहेबांना सोडलेले नाही, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

अजित पवार म्हणाले, तुम्हाला काहींना वाटत असेल की साहेबांना सोडायला नको होते. मित्रांनो मी साहेबांना सोडलेले नाही. मी साहेबांना सांगत होतो की सर्व आमदारांचे मत होते. माझ्या एकट्याचे मत नव्हते. सर्व आमदारांच्या सह्या आहेत. सर्वांचे मत होते की सरकारमध्ये जावे. आता सरकारमध्ये का जायचे? तर कामाला स्थगिती आली होती. आज या ठिकाणी बसलेल्यांपैकी संभाजी आणि राजवर्धन यांना विचारा. आपण मंजूर केलेल्या कामांना स्थगिती आली होती. तेव्हा म्हंटले हे तर तापच झाला. लोक मला तर वेड्यात काढतील कारण पैसे पाठवले आणि स्थगिती दिली. आता ती स्थगिती मी नव्हती दिली. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. स्थगिती सरकारने दिली होती, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये एकाच कुटुंबातील दोन उमेदवार निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे ही लढाई पवार कुटुंबियांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे.

युगेंद्र पवार यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील प्रचार सभा सुरू आहेत. बारामतीमधून कोण निवडून येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. युगेंद्र पवार यांना शरद पवारांचा पाठिंबा असल्याने याचा फायदा त्यांना निवडणुकीत होणार का? तसेच बारामतीमध्ये अजित पवारांचे वर्चस्व असल्याने पुन्हा एकदा त्यांनाच आमदारकी मिळणार असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. आता काही दिवसांतच याचा निकाल म्हणजे 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, त्याची उत्सुकता सर्वांना असल्याचे दिसून येत आहे.

Ajit Pawar big statement on the eve of elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात