नाशिक : भावा बहिणीच्या भाषणांची प्रादेशिक स्क्रिप्ट, कारण ठाकरे पवारांमध्ये काँग्रेसची फरफट!!, असेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रातल्या दौऱ्यावर केलेल्या भाषणांचे वर्णन करावे लागेल. राहुल आणि प्रियांका गांधी हे ज्या राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आहेत, त्या काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी क्वचितच पूर्वी कधी प्रादेशिक नेत्यांना फॉलो करून भाषणे केली असतील, परंतु राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फॉलो करूनच भाषणे करावी लागली, असे चित्र अमरावती, कोल्हापूर, शिर्डी मध्ये दिसले.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांच्याही भाषणातले बहुतांश मुद्दे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सेट केलेल्या नॅरेटिव्ह मधलेच होते. उदाहरण द्यायचे झाले, तर मोदी – शाहांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले. जातनिहाय जनगणना, ओबीसींना बजेट मध्ये किती स्थान दिले, वगैरे मुद्दे महाराष्ट्राच्या निवडणुकीत ठाकरे आणि पवारांनी सेट केले. त्यांना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी फॉलो केले.
Sharad Pawar : म्हणे, Vote Jihad हा शब्द फडणवीसांचाच; पवारांचा “जावईशोध”; सज्जाद नोमानींचे मात्र अप्रत्यक्ष समर्थन!!
वास्तविक मराठा वर्चस्वाचे एक जातीय राजकारण करणे हे शरद पवारांचे वैशिष्ट्य आणि गुजरात किंवा दक्षिणेतील राज्यांवर टीका करून महाराष्ट्राच्या प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करणे हे ठाकरेंचे वैशिष्ट्य. त्याच्या विपरीत सर्वसमावेशक राष्ट्रीय राजकारण करणे हे काँग्रेसचे वैशिष्ट्य. खरं म्हणजे राहुल आणि प्रियांका गांधी यांनी त्या वैशिष्ट्याला अनुसरून व्यापक भूमिकेतून भाषणे करायला हवी होती. पण त्यांनी तसे केले नाही.
वास्तविक काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी कुठल्याही राज्यात प्रचार करताना त्याच्या शेजारच्या राज्याची उणीदुणी काढून त्या संपूर्ण राज्याला दुखावले, असे क्वचितच घडले आहे. शक्यतो व्यापक राष्ट्रीय भूमिका घ्यायची, एका जातीय राजकारण करण्यापेक्षा जात समूहांच्या बेरजेचे राजकारण करायचे आणि आपल्या व्यक्तिगत करिष्म्याच्या बळावर निवडणुका जिंकायच्या हा पायंडा इंदिरा गांधी यांनी पाडला होता.
– काँग्रेसचे खच्चीकरण
पण इंदिरा गांधी यांचा हा अजेंडा आणि कर्तृत्व गांधी घराणेशाहीतल्या भावा बहिणीला पेलवत नसल्याने त्यांना ठाकरे आणि पवारांसारख्या नेत्यांना फॉलो करून त्यांनी सेट केलेल्या अजेंड्यानुसार भाषणे करावी लागली. त्यामध्ये गौतम अदानींसारख्या उद्योगपतींना दुखावून ठेवणे वगैरे प्रकार घडले, जे काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणासाठी बिलकुलच रूचणारे किंवा पचणारे नाहीत. ते काँग्रेसच्या दूरगामी खच्चीकरणास आमंत्रण देणारे ठरण्याची दाट शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App