भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवली जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Virat Kohli विराट कोहलीच्या दुखापतीची बातमी भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 ला एक आठवडाही शिल्लक नाही, त्यामुळे विराटच्या दुखापतीमुळे टीम इंडियावर मानसिक दडपणही येऊ शकते. एका रिपोर्टमध्ये विराटला दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला आहे, मात्र दुखापतीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवली जाणार आहे.Virat Kohli
एका ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला गुरुवारी काही स्कॅन करावे लागले, मात्र याचे कारण समोर आलेले नाही. चांगली बातमी अशी आहे की कोहलीची कोणतीही चाचणी झाली असली तरीही तो शुक्रवारी सिम्युलेशन मॅचमध्ये खेळताना दिसला.
या सिम्युलेशन मॅचमध्ये कोहलीने 15 धावा केल्या, मात्र यादरम्यान केएल राहुलमुळे टीम इंडियाचा तणाव वाढला आहे. फलंदाजी करताना चेंडू राहुलच्या कोपरावर आदळल्याने त्याने फलंदाजी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळाने त्याला दुखापत होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App