नाशिक : Ramgiri Maharaj अमेरिकेसारख्या बलाढ्य ख्रिश्चन राष्ट्रात हिंदूंची एकजूट तिथल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना उपयोगी ठरू शकते, तर भारतात तशी हिंदूंची एकजूट झाली, तर का नाही उपयोगी ठरणार??, असा परखड सवाल रामगिरी महाराजांनी “द फोकस इंडिया”ला दिलेल्या मुलाखतीत केला.Ramgiri Maharaj
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने देव दिवाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रामगिरी महाराज यांची काळाराम मंदिर ते गोदावरी रामघाट अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. रामगिरी महाराजांच्या हस्ते दुतोंड्या मारुतीजवळ रामतीर्थावर गंगा गोदावरी महाआरती करण्यात आली. हजारो नाशिककर हा नेत्रदीपक महाआरती सोहळा अनुभवण्यासाठी रामतीर्थावर उपस्थित होते. रामगिरी महाराजांच्या हस्ते गंगा गोदावरी पूजन करून नंतर महाआरती करण्यात आली.Ramgiri Maharaj
यानंतर अहिल्या राम मंदिरामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी “द फोकस इंडिया”शी त्यांनी देशकाल परिस्थिती विषयी मनमोकळा संवाद साधला. यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदूंची एकजूट हाणून पाडण्यासाठी जाती जातींमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान, त्यांची वादग्रस्त ठरविली गेलेली वक्तव्ये यांपासून ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आदी विषयांचा समावेश होता.
Anurag Thakur 23 नोव्हेंबरनंतर झारखंडमध्ये NDA सरकार स्थापन होईल – अनुराग ठाकूर
सत्य वक्तव्ये वादग्रस्त ठरवायची प्रवृत्ती
माध्यमांमध्ये आज कम्युनिस्टांचा प्रचंड प्रभाव आहे. ते देशात घडणाऱ्या घातपाती कृत्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना वादग्रस्त ठरवत नाहीत, पण त्या घातपाती कृत्यांना कुणी विरोध केला आणि त्याविषयी वक्तव्य केलं, तर मात्र त्याला ही कम्युनिस्ट प्रभावाखालची माध्यमे लगेच वादग्रस्त ठरवून मोकळी होतात. अनेक सत्य वक्तव्यांना ते खोट्या नॅरेटिव्हने झाकोळून टाकायचा प्रयत्न करतात, अशा परखड शब्दांमध्ये रामगिरी महाराजांनी भारतातल्या माध्यमांची आणि कम्युनिस्ट प्रवृत्तीची निर्भत्सना केली.Ramgiri Maharaj
हिंदुत्वच जातीभेदावर प्रभावी ठरेल
भारतात हिंदुत्वाचे वातावरण तयार होत असताना त्याला मुद्दामून जातीभेदाचा छेद देण्यात येतोय, त्यावर उपाययोजना काय??, या संदर्भात विचारले असता रामगिरी महाराज म्हणाले, सुदैवाने सोशल मीडियामुळे आज तरुण वर्गामध्ये हिंदुत्व आणि जातीभेद या परस्पर विरोधी गोष्टी आहेत, याविषयी मोठी जागृती होत आहे. जुन्या खोडांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षाही नाही, पण तरुण वर्गामधल्या जागृतीमुळे हिंदुत्वाच्या वातावरणात जातीभेद फारसा आडवा येऊ शकणार नाही, असा आशावाद रामगिरी महाराज यांनी व्यक्त केला.
– कम्युनिस्टांचे खोटे नॅरेटिव्ह कोसळेल
यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उदाहरण दिले. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना देखील हिंदू एकजुटीचे महत्त्व पटले. त्यांनी त्याचा उल्लेख प्रचारादरम्यान केला. हिंदूंच्या एकजुटीचा उपयोग त्यांना विजय मिळवण्यासाठी झाला. अमेरिकेसारख्या ख्रिश्चन राष्ट्रामध्ये जर हिंदूंच्या एकजुटीचा उपयोग होऊ शकतो, तर भारतात आजही हिंदू बहुसंख्यांक आहेत, मग हिंदूंच्या एकजुटीचा इथे का नाही उपयोग होणार??, असा सवाल रामगिरी महाराजांनी केला. ज्यावेळी भारतात हिंदूंची मजबूत एकजूट होईल, त्या दिवशी कम्युनिस्टांचे खोटे नॅरेटिव्ह देखील कोसळून पडेल, याविषयी त्यांनी खात्री व्यक्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App