Manoj Jarange मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा, मनोज जरांगे यांचे छगन भुजबळांच्या येवल्यात आवाहन

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Manoj Jarangeमराठा आंदोलक यांनी शनिवारी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेऊन मराठा समाजाला विरोध करणाऱ्या दोघांना निवडणुकीत पाडण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे.Manoj Jarange

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे राजकीय प्रचाराला वेग आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यात त्यांनी इथे दोघांना पाडा असे आवाहन केले. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे होता असा दावा केला जात आहे.

छगन भुजबळ हे येवला – लासलगाव मतदारसंघातून मैदानात आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांनी आव्हान दिले. तर समीर भुजबळ हे नांदगाव – मनमाड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार सुहास कांदे व ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्याशी आहे. या तिरंगी लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.



ही माझी येवल्याला सांत्वनपर भेट

मनोज जरांगे म्हणाले की, येवल्याला ही माझी सांत्वनपर भेट आहे. हे गाव आता आमच्या रस्त्यात आले. त्याला आता मी बाजूला सारू का. मी इथे कुणाला पाडायचे हे सांगण्यास आलो नाही. पण येथील मतदारांनी मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडावे. आता त्यामुळे कुणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष?Manoj Jarange

येवल्यात विशेष असे काहीच नाही. हा मतदारसंघ काही राज्याबाहेर नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही. मी ठरवले की डायरेक्ट कार्यक्रम करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. पण तो ही सारखा सारखा बिघडत आहे, असे ते म्हणाले.Manoj Jarange

आंतरवालीत करणार सामूहिक उपोषण

उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांचे येवल्याच्या अंदरसूल येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी तेथील मराठा बांधवांची मोठी गर्दी उसळली होती. जरांगे यांनी यावेळी राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आंतरवाली सराटीत सामूहिक उपोषण सुरू करण्याचाही इशारा दिला. त्यासाठी मराठा समाजाच्या नागरिकांना त्यांनी मोठ्या संख्येने आंतरवालीत येण्याचे आवाहन केले.

Manoj Jarange appeal in Chhagan Bhujbal Yewala, Loss those who oppose the Maratha community,

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात