इंफाळ खोऱ्यात सध्या अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : Maitai मणिपूरमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. लष्कराच्या कारवाईत कुकी-जो समाजाच्या 10 बंडखोरांना ठार केल्यानंतर जिरीबाममध्ये मैतई समाजाच्या सहा लोकांचे मृतदेह सापडल्याने संपूर्ण राज्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.Maitai
मैतेई समुदायाच्या तीन महिला आणि तीन मुलांचे एका छावणीतून अपहरण केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केल्याचे वृत्त आहे. यानंतर संपूर्ण परिसरात हिंसाचार उसळला आणि मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या जावई यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले.
जिरीबाम येथील बराक नदीत शनिवारी दोन महिला आणि एका मुलाचे मृतदेह सापडले. दरम्यान, शुक्रवारी रात्री एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले. यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे इंफाळ खोऱ्यात सध्या अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये शनिवारी आंदोलकांनी सरकारचे तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. यामध्ये भाजपचे आमदार आणि एन. बिरेन सिंह यांचे जावई आरके इमो यांच्या घराचाही समावेश होता. संतप्त जमावाने अनेक मालमत्तांनाही आग लावली. त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या होत्या. रविवारी या हिंसाचाराशी संबंधित अनेक खूना रस्त्यावर दिसून आल्या. ज्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली त्या ठिकाणी ढिगारा तसाच पडलेला दिसत होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App