वाढत्या इंधनदरांसाठी केंद्राला दोषी ठरवणं अयोग्य असल्याचं दानवे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये म्हटलं आहे. ‘Fuel prices are US, it is inappropriate to blame central government’
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. या पेट्रोल दरवाढीवरुन विरोधी पक्ष केंद्र सरकारवर वारंवार टीका करत आहे.काही दिवसांपूर्वी पेट्रोलच्या दराने चक्क शंभरी पार केली होती. केंद्रावर सर्वसामान्य नागरिक चांगलेच संतापले होते .वाढत्या इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर निशाणा साधला जातो. अनेक ठिकाणी आंदोलन केले गेली.
इंधनाचे दर हे अमेरिका ठरते त्यामुळे केंद्र सरकारला दोषी ठरवणं चुकीचं आहे, असं मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. वाढत्या इंधनदरांसाठी केंद्राला दोषी ठरवणं अयोग्य असल्याचं दानवे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये म्हटलं आहे.
पुढे दानवे म्हणाले की इंधनदरवाढीसाठी केंद्र सरकारला लक्ष्य करणं चुकीचं आहे. “इंधन दरवाढीविरोधात देशामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. मात्र इंधनाचे दर हे जागतिक बाजारामधील परिस्थितीवर अवलंबून असतात.
केंद्राने दिवाळीच्या दिवशी एक्साईज टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये ५ आणि ७ रुपये अशी किंमती कमी झाल्या. दरम्यान आता महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App