चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाल्यामुळे भाजपसाठी हे मोठं यश मानलं जातं तर आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला हा धक्का मानला जात आहे. Fadnavis reacted after the victory of Bavankule; This big cum back ….
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. तर अकोलामध्ये भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले असून अकोल्याची जागा देखील भाजपने जिंकली आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन झाल्याचं बोलल्या जातंय.चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाल्यामुळे भाजपसाठी हे मोठं यश मानलं जातं तर आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला हा धक्का मानला जात आहे.
नागपुरमध्ये कट्टर समर्थक पराभूत, चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का ; काँग्रेसची ९ जागा जिंकून घोडदौड
दरम्यान भाजपने या यशानंतर जल्लोष केला असून,भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रीया दिली असून, हा विजय हे मोठं कम बॅक असल्याचं त्यांनी सांगितलं.विधान परिषदेच्या ६ पैकी ४ जागेवर भाजपला विजय मिळाला असून, राज्यातील जनता भाजपसोबत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय भविष्यातील विजयाची नांदी आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन गडकरी यांचंही आभार मानलं. तसेच आपण स्वत: निवडून आल्यावर जेवढा आनंद झाला नव्हता तो आनंद आता झाल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App