विशेष प्रतिनिधी
सातारा : मिनी काश्मीर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. लिंगमळा आणि वेण्णा लेक परिसरात तर दवबिंदू गोठले असून ५ अंशावर आला आहे. Extreme cold in Mini Kashmir Mahabaleshwar; Snowfall in Vennalek area
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे हे काश्मीर फारच गारठले आहे. दवबिंदूचे बर्फात होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा नजारा अवर्णनीय असा असतो. अनेक ठिकाणी हे दवबिंदू गोठलेल्या अवस्थेत खाली पडत आहेत.
वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातील सुमारे २ किलोमीटरचा पट्ट्यात किमान तापमान ५ अंश सेल्सियस पर्यंत खाली उतरले. यामुळे त्या भागातील दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले. या भागात गाडीच्या टपावर शेतातील गवतावर,वेण्णालेक परिसरात सर्व ठिकाणी हिमकण गोठलेले पहायला मिळाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App