पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला ईडीने केलीअटक, अवैध वाळू उत्खनन प्रकरण


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला अंमलबजावणी संचालनालयाने अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. पंजाबमधील ईडी अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर हनीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत अटक केली.Punjab Chief Minister’s nephew arrested by ED, illegal sand mining case

गेल्या महिन्यात ईडीने पंजाबमधील मोहाली, लुधियाना, रूपनगर, फतेहगढ साहिब, पठाणकोट येथे हनी आणि इतरांच्या निवासस्थानी झडती घेतली होती. झडतीत १० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, मोबाईल फोन, २१ लाख रुपये किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ अशा वस्तू सापडल्या. त्या ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत.



१० कोटींपैकी ७.९ कोटी रुपये भूपिंदरसिंग हनीच्या घरातून जप्त करण्यात आले, तर अन्य संशयित संदीप सिंगच्या घरातून २ कोटी रुपये जप्त करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात असे समोर आले आहे की भूपिंदर सिंग, कुदरतदीप सिंग आणि संदीप कुमार हे प्रोव्हायडर्स ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत.

अवैध वाळू उत्खनन रॅकेटच्या आसपास मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तिघांची चौकशी केली जात आहे. बनावट कंपन्यांचा वापर करून पैसे उकळण्यासाठी आणि अवैध वाळू उत्खनन करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कंपनीची स्थापना ऑक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आली होती. सहा महिन्यांनंतर, कुदरतदीप सिंह यांच्याविरुद्ध अवैध वाळू उत्खनन प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. वाळूच्या खाणीचे कंत्राट मिळवण्यासाठी काळा पैसा गुंतवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. कंपनी छोटी असल्याने त्या कंपनीला करोडो रुपयांचे कंत्राट मिळण्याची शक्यता नाही.

Punjab Chief Minister’s nephew arrested by ED, illegal sand mining case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात