स्वान रिसर्च फाऊंडेशन, सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने आयोजन
विशेष प्रतिनिधी
पुणे : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा २० ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे. Exam on August 20 for NASA Training Program selection Indias first experiment at school level
इयत्ता ६ वी ते १० वी च्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २० जुलै २०२३ ते १५ ऑगस्ट २०२३ अशी असल्याची माहिती युएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्वान फाउंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलचे संचालक एम. तिरुमल, आयेशा सय्यद, स्वान फाऊंडेशनचे संस्थापक संचालक शशिकांत कांबळे, संचालक अश्विनी सांळुके आदी उपस्थित होते.
सुदेष्णा परमार म्हणाल्या, “स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये इ. ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात येत आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल. यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचे आहे.”
आयेशा सय्यद म्हणाल्या, “ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी २० जुलैपासून नावनोंदणी करता येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी सुरु राहील. २० ऑगस्ट रोजी नावनोंदणी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये ही परीक्षा होईल. परीक्षेचा निकाल २८ ऑगस्ट २०२३ रोजी घोषित होईल. या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सप्टेंबरमध्ये सत्कार होणार आहे. नोव्हेंबरमध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे. अमेरिकेला ३५ व सिंगापूर येथील सायन्स सेंटरला ३५ अशा ७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांचा सर्व खर्च संस्थेमार्फत केला जाणार आहे.”
‘’आज पालक आपल्या मुलाने अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी व्हावे, याकरिता अनेक प्रयत्न करताना दिसतात. परंतु ही परीक्षा अंतराळ एज्युकेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असेल.” असं एम. तिरुमल म्हणाले आहेत.
याचबरोबर “आज संपूर्ण जग विकासाच्या वाटेवर आहे. माणूस पृथ्वीपुरताच मर्यादित न राहता अवकाशातही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह तर मानवाच्या अगदी ओळखीचे झाले आहेत. अंतराळासंबंधित प्रयोग, अभ्यास आणि संशोधन हे प्रत्येक देश स्वतःच्या पद्धतीने करत असतो. संबंधित संशोधनासाठी अनेक देशांनी स्वतःची अंतराळ संस्था (Space Agency) तयार केली आहे. जगातील १९५ देशांपैकी फक्त ७२ देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. ‘नासा’ ही त्यापैकी सर्वांत सुप्रसिद्ध एजन्सी आहे. तीस वर्षांपूर्वी डॉ. वॉन ब्राऊन यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच खगोलशास्त्रात रुची निर्माण व्हावी आणि या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवता यावीत, यासाठी यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर सुरु केले.” असे युएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more