म्हणे, NDA च्या बैठकीचे पवारांना “निमंत्रण”; ते तर यशवंत मार्गाने राजकीय कुंपणावर!!



राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घमासानाचे वर्णन अजितदादा यशवंत मार्गाने सत्तेवर आणि स्वतः पवार यशवंत मार्गाने कुंपणावर!! या शब्दांनी करावे लागेल.Sharad pawar like y.b. chavan is sitting on the political wall between NDA and I.N.D.I.A

कारण राष्ट्रवादी काँग्रेस म्हटले तर फुटली आहे आणि म्हटले तर फुटलेली नाही. म्हणजे एकीकडे भाजपच्या वळचणीला जाऊन अजित पवार सत्तेवर बसले आहेत, तर दुसरीकडे सकृत दर्शनी तरी शरद पवार विरोधात आहेत.

पण काल सत्ताधारी NDA आणि विरोधी I.N.D.I.A यांच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर ज्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवला, तर शरद पवारांना I.N.D.I.A च्या बैठकीला जाऊ न देता, त्यांना NDA च्या बैठकीला दिल्लीत आणण्याची जबाबदारी मोदी – शाहांनी म्हणे प्रफुल्ल पटेल आणि अजितदादांवर सोपवली होती. त्यामुळेच पटेल आणि अजितदादांनी दोन वेळा इंटर ला जाऊन शरद पवारांची म्हणे मनधरणी केली होती. शरद पवारांची यशवंतराव चव्हाण मराठी माध्यमांनी आज सूत्रांच्या हवाल्याने या बातम्या दिल्या. आता या बातम्या खऱ्या आहेत की नेहमीप्रमाणे सूत्रांच्या हवाल्याने पवारांनीच सोडलेल्या पुड्या आहेत, हे नजीकच्या काळात समजेल. पण या बातम्या खऱ्या असोत की पुड्या असतोत, पण यानिमित्ताने पवार मात्र NDA आणि I.N.D.I.A यांच्या कुंपणावर बसल्याचे चित्र यातून निर्माण झाले आहे.



भले पवार काल I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत सामील होण्यासाठी बंगलोरला गेलेही असतील, पण तिथे ते पत्रकार परिषदेत उघडपणे काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त आपल्या ट्विटर हँडलवर तिथल्या नेत्यांच्या भेटीगाठींचे फोटो टाकले. “एकत्र लढू या”, असा संदिग्ध संदेश दिला. पण त्यापलीकडे पवारांनी पत्रकार परिषदेत कोणतेच उघड वक्तव्य केले नाही.

त्यानंतर 12 तासांनी मराठी माध्यमांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मधील सलग दोन बैठकांचा सूत्रांच्या हवाल्याने खुलासा केला. अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि आमदारांना पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेटले अशा बातम्या आल्या होत्या. पण प्रत्यक्षात त्या “आशीर्वाद बैठका” नव्हत्या, तर पवारांना I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीला जाण्यापासून परावृत्त करून त्यांना NDA च्या बैठकीत आणण्यासाठी त्या “पटविण्याच्या बैठका” होत्या असा “साक्षात्कार” मराठी माध्यमांना झाला, तो त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने आज उघड केला!!

पण याचा अर्थच पवार शरीराने I.N.D.I.A च्या बैठकीत आणि मनाने NDA कुंपणावर असा काढला जाऊ शकतो आणि कुंपणावर बसणे हा तर “यशवंत मार्ग” आहे.

यशवंतराव एक तर सत्तेवर नाही तर कुंपणावर!!

यशवंतराव चव्हाण नेहमीच आपल्या राजकीय कारकिर्दीत एकतर सत्तेवर होते किंवा कुंपणावर बसत आले होते. कधी ते सिंडिकेट मध्ये असत, तर कधी इंडिकेट मध्ये. जेव्हा इंडिकेटचे पारडे जड झाले, तेव्हा यशवंतराव इंदिरा गांधींपुढे शरणागत झाले. 1977 मध्ये इंदिरा गांधी हरल्यानंतर यशवंतरावांचे मंत्रीपद गेले. मग ते इंदिरा गांधींच्या विरोधात गेले. त्यांनी चव्हाण – रेड्डी काँग्रेस काढली. लोक त्यांच्या काँग्रेसला “चड्डी काँग्रेस” म्हणून चिडवायला लागले. पण दोन वर्षे कशीबशी ती काँग्रेस चालवल्यानंतर यशवंतराव पुन्हा कुंपणावर बसून राहिले आणि 1980 मध्ये इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यानंतर ते आपली चव्हाण – रेड्डी काँग्रेस मोडून इंदिरा गांधींना पुन्हा शरणागत झाले.

 पवारांची यशवंत नीती

नेमकी हीच “यशवंत नीती” आज पवार वेगळ्या पद्धतीने अंमलात आणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व सत्तेशिवाय टिकू शकत नाही. आपले सहकारी आपल्याबरोबर सत्तेशिवाय राहणार नाहीत हे पक्के माहिती असल्याने त्यांनी अजितदादा आणि प्रफुल्ल पटेलांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून दिले. तुमच्या वरच्या केसेस आणि तुम्ही परस्पर तिकडे जाऊन मिटवा, असा “राजकीय संदेश” त्यांनी देऊन टाकला आणि स्वतः I.N.D.I.A च्या बैठकीला बंगलोरला गेले. त्या बैठकीला सुप्रिया सुळेंना त्यांनी आपल्याबरोबर नेले नाही. ही राजकीय चतुराई देखील पवारांनी दाखवली. त्या बैठकीत पवारांना ज्येष्ठतेच्या मानाखेरीज फारसे काही मिळाले नाही म्हणून I.N.D.I.A च्या बैठकीनंतर 12 तासांनी आपल्याला NDA
चे “निमंत्रण” होते, अशा बातम्या “सोडल्या.”

याचा अर्थ पवार NDA आणि I.N.D.I.A यांच्या कुंपणावर बसले आहेत, असाच निघतो. अजितदादांनी “यशवंत मार्गे” जाऊन भाजपच्या सत्तेची वळचण पकडली, तर पवार “यशवंत मार्गे” जाऊन राजकीय कुंपणावर बसले!!, हे आजचे 19 जुलै 2023 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्र आहे. यात पवारांच्या मनातल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला  मुख्यमंत्री कुठे दिसत आहेत??, शोधावे लागेल!!

Sharad pawar like y.b. chavan is sitting on the political wall between NDA and I.N.D.I.A

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात