व्हिडिओ कांडात अडकलेल्या किरीट सोमय्यांच्या मदतीला आले जितेंद्र आव्हाड!!


प्रतिनिधी

मुंबई : व्हिडिओ कांडात अडकलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आले आहेत. वैयक्तिक हल्ले करून एखाद्याचे राजकीय जीवन संपवण्याच्या प्रकाराचा मी निषेध करतो. राजकारणात वैचारिक शत्रू असू शकतो पण अशाप्रकारे वैयक्तिक हल्ले करून एखाद्याचे जीवन उध्वस्त करणे करण्याचा कोणालाच अधिकार नाही असे ट्विट त्यांनी केले आहे. Jitendra Awhad came to the rescue of Kirit Somaiya who was caught in the video scandal

ह्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात :

राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तिक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.

त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.

मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबा-याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तीक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणा-या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही.

मात्र असे ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्यांच्या मदतीला धावल्यामुळे राजकीय वर्तुळात ते चर्चेचा विषय ठरले आहेत.

Jitendra Awhad came to the rescue of Kirit Somaiya who was caught in the video scandal

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात