औस समुद्रकिनाऱ्यावर आढळलेला तो मोठा तुकडा चांद्रयान-३चा असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर एक रहस्यमय वस्तू सापडली आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात धातूचा एक मोठा तुकडा वाहून आला. या रहस्यमय वस्तूची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. छायाचित्रे पाहून अनेकांच्या मनात प्रश्न आला की हा चांद्रयान-३ रॉकेटचा तुकड आहे का? मात्र याबाबत आता खुद्द इस्त्रो प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान सोमर आलं आहे. ISRO chief Somnaths big statement about mysterious object found on the Australian beach
या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर ‘इस्त्रो’ प्रमुख सोमनाथन म्हणाले की, जो पर्यंत आम्ही त्या वस्तूचे परीक्षण करत नाही, तोपर्यंत ती आमची आहे हे आम्ही सांगू शकणार नाही. तसेच, सुमद्रकिनाऱ्यावर वाहून आलेला तो मोठा धातूचा तुकडा निश्चितचपणे एका क्षेपणास्त्राचा तुकडा आहे, तो भारतीय असूही शकतो आणि नसूही शकतो.
अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या भारताच्या ऐतिहासिक चांद्रयान मोहिमेनं पहिला टप्पा यशस्वी पार केला आहे. इस्त्रोच्या महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-3 मिशन लॉन्च झालं आहे. . यशस्वीपणे चांद्रयान हे अंतराळात स्थिरावलं आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 ने 14 जुलै दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान – 3 विकसित करण्यात आलं. आज अखेर हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयान 3 ऑगस्टमध्ये लँड करेल आणि त्याचा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App