विशेष प्रतिनिधी
पुणे : सध्याचा काल हा ओटीटीचा काळ म्हणून बघितला जातो.भारता मध्ये ओटीटी साठी मोठा प्रेक्षक वर्ग आहे. मात्र गेल्या काही दिवसा पासून ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील कंटेट यावरुन गेल्या काही महिन्यांपासून वाद होताना दिसतो आहे. सध्या भारतीय प्रसारण मंत्रालय आणि माहिती सुचना केंद्र यांच्याकडून कोणत्याही स्वरुपाच्या लेखी सुचना या माध्यमासाठी नसल्यानं कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अश्लीलतेचा होणारा भडिमार अनेकांच्या चिंतेचा विषय आहे. Rules and regulations for ott platform .
परदेशी ओटीटीच्या चा आधार घेतं, भारतात देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सिनेमॅटिक लिबर्टी या सगळ्यांच्या नावाखाली ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या सिरीज, सिनेमे शॉर्ट फिल्म या सगळ्याचं आणि त्याच्यातील अश्लील कंटेंट यामुळे प्रेक्षक वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.
कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आणि प्रचार झाला . प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर ओटीटीकडे वळाला . मात्र ओटीपी मध्ये होत असलेल्या अश्लील त्याच्या भडिमारामुळे प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज होता . या कंटेंट वर कुठल्याही प्रकारचा सरकारी अंकुश नसल्याने . अनेकांची नाराजी होती.
आता प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ओटीटीसाठी खास नियमावली तयार करण्याचे संकेत दिले आहे. यापूर्वी देखील ओटीटीवरील कंटेटवरील निर्बंधासाठी सरकारकडून काही धोरणांची आखणी करण्यात आली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह कंटेटवर बंदी आणण्यासाठी सरकारच्यावतीनं एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टींची चर्चा करण्यात आली.
याविषयी अधिक माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ओटीटीवर जो अश्लील कंटेट, आक्षेपार्ह शब्द, भाषा यांचा प्रयोग केला जातो त्यावर आता बंधनं आणली जाणार आहेत. ओटीटीवरील कंटेट हा सर्वच वयोगटातील प्रेक्षक पाहत असतात. त्यांच्यावर होणारा परिणाम हा गंभीर विषय आहे. याचा विचार निर्माते, दिग्दर्शक करत नाही. आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यत प्रभावीपणे पोहचावी यासाठी ते ज्याचा आधार घेतात त्याचा होणारा परिणाम किती भयानक आहे हे जाणून घेण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more