वृत्तसंस्था
पाटणा : देशातल्या सर्व विरोधी पक्षांच्या कालच्या बंगलोर मधल्या बैठकीनंतर I.N.D.I.A आघाडी स्थापन करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बाकीच्या नेत्यांनी I.N.D.I.A आघाडीचा अर्थ समजावून सांगितला. मात्र, त्या पत्रकार परिषदेला सोनिया गांधी, नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव उपस्थित नव्हते त्यामुळे नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचा नाराजीच्या बातम्या काल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत प्रसार माध्यमांमध्ये चालल्या. या बातम्या चालू झाल्यानंतर लगेच खुलासा करायला नितीश कुमार पुढे आले नाहीत, तर 24 तास उलटून गेल्यानंतर त्यांनी आपण नाराज नसल्याचा खुलासा केला. Nitish – News of Lalu’s displeasure, Nitish Kumar’s disclosure after 24 hours
देशातल्या 26 पक्षांनी मिळून विरोधी आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवले. त्यात आपल्या नाराजीचा प्रश्नच नाही. बैठक संपल्यानंतर आम्हाला परवानगी द्या, असे सांगून मीच बाहेर पडलो. यात नाराजीचा सवाल येत नाही. विरोधी आघाडीत आणखी काही पक्ष सामील होतील. पण आत्ता त्यांची नावे मी सांगणार नाही. कारण भाजप व त्यांना कॅप्चर करेल, असे वक्तव्य नितीश कुमार यांनी केले.
पण नितीश कुमार यांनी नाराजीच्या बातम्या मात्र 24 तास राजकीय हवेत राहू दिल्या. नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात चालू ठेवली. त्यांनी ताबडतोब पुढे येऊन खुलासा केला नाही. त्याचबरोबर लालूप्रसाद यादव हे नाराज असल्याच्या बातम्या चालल्या पण त्यांच्या तर अजूनही खुलासा समोर आलेला नाही.
– नितीश – लालूंचे बस्तान बसेना!!
मूळात नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव हे I.N.D.I.A मधल्या बैठकीपासूनच नाराज असल्याच्या बातम्या आहेत. नितीश कुमार यांना राष्ट्रीय राजकारणात पाठवून दिल्यानंतर बिहार आपल्यासाठी “मोकळा” करून घेऊन तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्यासाठी लालूप्रसाद यादवांची घाई चालली आहे. यासाठी लालूप्रसाद यांनी बिहार मधल्या बाकीच्या पक्षांची विशेषत: काँग्रेसशी देखील संधान बांधले आहे.
पण नितीश कुमार यांचेच केंद्रात काही जमायला तयार नाही. पाटण्यानंतर बंगलोर मध्ये बैठक झाली. तेथे आघाडीचे I.N.D.I.A नाव ठरले. पण नितीश कुमार यांना आघाडीच्या अध्यक्षपदी नेमणे तर सोडाच, त्यांना साधे संयोजकही बंगलोरच्या बैठकीत नेमले नाही.
– नितीश – लालू इच्छा अपूर्ण
वास्तविक काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या व्यक्तिगत सूचनेनंतर नितीश कुमार यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत भेटायला जाऊन त्यांची मने वळवून विरोधी आघाडीची मोट बांधली. त्यातून आपल्याला राष्ट्रीय पातळीवर संयोजक म्हणून किंवा विरोधकांचा सर्वमान्य उमेदवार म्हणून पंतप्रधान पदाची संधी दिली जाईल, अशी नितीश कुमार यांची अपेक्षा होती. यापैकी त्यांची कोणतीच अपेक्षा फुलद्रूप झाली नाही. 26 पक्षांची आघाडी झाली या आघाडीने जुने युपीए नाव टाकून दिले. नवे I.N.D.I.A नाव धारण केले. पण नितीश कुमार यांचे राष्ट्रीय राजकारणात बस्तान बसू दिले नाही. त्यामुळे नितीश कुमार आता बिहारच्याच राजकारणात राहणार आहेत आणि ही लालूप्रसारांची खरी पंचाईत आहेत. कारण नितीश कुमार बिहारच्या राजकारणात राहिल्याने तेजस्वी यादवांचे बस्तान बिहारमध्ये मुख्यमंत्री बनून बसणे कठीण झाले आहे. म्हणून 26 पक्षांची इंडिया आघाडी बनवूनही नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव नाराज चालले आहेत. ही खरी विरोधी ऐक्याची “असफळ” “असंपूर्ण” कहाणी आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more