विशेष प्रतिनिधी
वर्धा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सहाय्यक मिलिंद नार्वेकर स्वत:ला वाघ म्हणतात. गुंडांची इतकी हिम्मत की ते वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना व्हाट्सअप करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे. पोलीसांची भीतीच राहिली नाही, असा आरोप माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. नार्वेकरांना धमकी देणाऱ्याचे चरित्र मलाही जाणून घ्यायचंय. थेट वाघाच्या गुहेत जाऊन धमकी दिली, हा कोण आहे बाबा? असेही ते म्हणाले. Even Milind Narvekar, who calls himself a tiger has threat, no fear of law and order, Sudhir Mungantiwar alleges
मुनगंटीवार म्हणाले, वीस वर्षांपूर्वी राजकारणाचं गन्हेगारीकरण हा विषय चचेर्ला आला होता. पण, आता गुन्हेगारांचे राजकारण हा नवीन चर्चेचा विषय आहे. यासंदर्भात कायदे करण्याची गरज आहे. खंडणी मागण्याची, आमच्या माणसाला काम द्या, युट्युबवर अनेक ऑडीओ क्लिप आहेत. पोलीस विभागाने सुमोटो कारवाई केली पाहिजे. राज्यात खंडणी मागणारे सुरक्षित आहेत, पण त्रास होणाऱ्यात मात्र असुरक्षिततेची भावना आहे.
असुरक्षिततेची भावना असेल तर सर्वांनी याचा एकत्र येऊन विचार केला पाहिजे. खंडणी मागणारे या पक्षाच्या, त्या पक्षाच्या नेत्यांच्या मागे जाऊन त्यांचे नारे लावत स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. खंडणी मागणाऱ्यांना फोडून काढण्यासाठी कायदा केला पाहिजे. त्यांना मोक्का लावून आत टाकावे.
शरद पवारांचा आवाज काढून बदली करण्यास सांगितले याचा अर्थ काय? असे सांगणाऱ्याला बेड्या ठोकल्या पाहिजे. कोणाचा ओरिजनल आवाज असला तरी बदली करायची नाही, असा जी आर सरकारने काढला पाहिजे. नार्वेकरांना धमकी देणं हे तर मलाही आश्चर्य वाटत. नार्वेकरांना धमकी देणाऱ्याचे चरित्र मलाही जाणून घ्यायचंय. थेट वाघाच्या गुहेत जाऊन धमकी दिली, हा कोण आहे बाबा? असेही मुनगंटीवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App