‘मागण्या मान्य केल्या नाही तर ईडी, सीबीआय मागे लावू’, मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरांना व्हॉट्सअॅपवर धमक्या

CM Thackeray PA Milind Narvekar gets threatening message on whatsapp of ED CBI NIA enquiry against him

Milind Narvekar gets threatening message on whatsapp : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज आल्यानंतर खळबळ उडाली आहे. संदेशात लिहिले आहे की, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ईडी, सीबीआय आणि एनआयए सारख्या तपास यंत्रणा त्यांच्या मागे लागतील. मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. CM Thackeray PA Milind Narvekar gets threatening message on whatsapp of ED CBI NIA enquiry against him


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज आल्यानंतर खळबळ उडाली आहे. संदेशात लिहिले आहे की, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ईडी, सीबीआय आणि एनआयए सारख्या तपास यंत्रणा त्यांच्या मागे लागतील. मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी धमकी पाठवणाऱ्याने कोणती मागणी केली आहे याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. फक्त एवढेच सांगण्यात आले आहे की, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ईडी, एनआयए आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांना त्यांच्याविरुद्ध वापरण्याची धमकी देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

मुरुडच्या बंगल्यावरून नार्वेकरांवर सोमय्यांनी केले होते आरोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमय्या यांच्या मते, मिलिंद नार्वेकर यांनी कोकण विभागातील दापोलीमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे समुद्रकिनारी बंगला बांधला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी हा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीच्या मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर 72 गुंठे जमीन घेतली असून त्यावर बेकायदेशीरपणे दोन मजली बंगला बांधण्याचे काम सुरू केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर जंगले आणि झाडे तोडण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते.

CM Thackeray PA Milind Narvekar gets threatening message on whatsapp of ED CBI NIA enquiry against him

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात