विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : संपूर्ण जगाला वेठीस धरणाºया कोरोना महामारीला चीन जबाबदार आहे, असा आरोप होत आहे. मात्र, अमेरिकेत चीन्यांवरचा राग सगळ्याच अशियाई नागरिकांवर काढला जात आहे. अशियाई नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.Asiaans targeted in America after Corona
अमेरिकेत वांशिक कारणावरून हल्ला केल्यास कडक कारवाई होते. मात्र, तरीही हल्यांचे प्रमाण वाढत आहे. १९ मार्च २०२० ते जून २०२१ या काळात अशियाई नागरिकांवर हल्याच्या ९०८१ घटना घडल्या आहेत. चीनमध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरस सापडला होता.
त्यानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लागण होऊ लागली. तेव्हापासून अशियाई नागरिकांवर हल्ले वाढले आहेत. अमेरिकेतील एकूण हल्यांपैकी अशियाई नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण २०२० मध्ये १०.८ टक्के होते. मात्र, या वर्षी हे प्रमाण १६.६ टक्यांवर गेले आहे.
यापैकी बहुतांश घटना या सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहेत. अगदी रस्त्यावर जातानाही अशियाई नागरिक दिसला तर त्याच्यावर हल्ले होतात. त्याचबरोबर व्यावसायिक ठिकाणी अशियाई नागरिकांना रोखण्यासाठी त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकेतील अनेक शहरांमधील काही भागात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला अशियाई नागरिकांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरुध्द हिंसाचार वाढला आहे. जी सर्व घटनांपैकी .2.२ टक्के होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App