विशेष प्रतिनिधी
काबूल : अफगणिस्थानमधील बहुतांश प्रांत जिंकत राजधानी काबूलच्या दिशेने तालीबानी कूच करत आहेत. त्यांना भारताविरुध्द वापरण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. मात्र, भारत व पाकिस्तानमधील शत्रुत्वात सामील होण्याची आम्हाला इच्छा नाही, असे तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहैल शाहिन यांनी स्पष्ट केले आहे. आमचा स्वातंत्र्यलढा अफगणिस्थानसाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. The Taliban also told Pakistan that it did not want to join the Indo-Pakistani animosity
अफगाणिस्तान सरकारशी शांततेसंदर्भात चर्चा करणाऱ्या तालिबानच्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. मोहम्मद सुहैल शाहिन यांनी दोहा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ज्याप्रमाणे भारताने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ब्रिटिशांविरोधात लढा दिला तसेच आमचेही स्वातंत्र्ययुद्ध सुरू आहे. दुसºया कोणत्याही देशाविरुद्ध अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर होऊ देण्यास तालिबानचा विरोध आहे.
तालिबानींवर भारतामध्ये अनेक आरोप होत असतात. पाकिस्तान हा आमचा शेजारी देश आहे. लाखो तालिबानी निर्वासित सध्या पाकिस्तानमध्ये राहत आहे. या तालिबानी निर्वासितांनी जगातील ४४ ते ५४ देशांतील संघर्षात भाग घेतला व अमेरिकेविरुद्ध २० वर्षे युद्ध केले, या आरोपांत काहीही तथ्य नाही. अफगाणिस्तानातील सर्व स्तरातल्या नागरिकांनी त्या देशावर झालेल्या आक्रमणाविरोधात आजवर लढा दिला आहे.
अफगाणिस्तानमधील युद्धात जखमी झालेल्या तालिबानींवर पाकिस्तानात उपचार सुरू असल्याचे म्हटले जाते.तसे काहीही घडलेले नाही. अफगाणिस्तानात आपत्कालीन रुग्णालये चालविण्यासाठी तालिबानी रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीला संपूर्ण सहकार्य करत आहेत. आमच्यावर अनेकदा राजकीय हेतूने आरोप होत असतात, असेही शाहिन यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App