विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारमधील परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 28 सप्टेंबरला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. अनिल परब यांनीच गणेशोत्सवानंतर हजर राहण्यासाठी ईडीकडे पहिल्या नोटिशीचा वेळी मदत मागितली होती. आता गणेशोत्सव संपल्याने ईडीने त्यांना हजर राहण्याची नोटीस काढली आहे. Enforcement Directorate summons Shiv Sena leader and Maharashtra Minister Anil Parab for Tuesday, in connection with a money laundering case.
पण दरम्यानच्या काळात अनिल परब यांच्या घोटाळ्यांविषयी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना नेमकी माहिती कोणी पुरवली? यावरून दोन शिवसैनिकांमध्येच भांडण जुंपले आहे. शिवसैनिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी अनिल परब यांच्या घोटाळ्यांविषयी माहिती पुरविल्याचा आरोप कोकणातील खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेत बरीच खळबळ माजली आहे.
Enforcement Directorate summons Shiv Sena leader and Maharashtra Minister Anil Parab for Tuesday, in connection with a money laundering case. Earlier, Parab was summoned on August 31 but didn't show up. pic.twitter.com/XMzaAwot2Y — ANI (@ANI) September 25, 2021
Enforcement Directorate summons Shiv Sena leader and Maharashtra Minister Anil Parab for Tuesday, in connection with a money laundering case.
Earlier, Parab was summoned on August 31 but didn't show up. pic.twitter.com/XMzaAwot2Y
— ANI (@ANI) September 25, 2021
तर प्रसाद कर्वे यांनी वैभव खेडकर यांच्यावरच प्रत्यारोप करून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने ते असले उद्योग करतात. आपले नगराध्यक्षपद वाचवण्यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला वर्षावर गेले होते, असा आरोप केला आहे.
एकीकडे अनिल परब यांच्यावर ईडीच्या चौकशीची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे त्यांच्या घोटाळ्याची माहिती पुरवणे या विषयावरून शिवसैनिकांमध्यचे भांडण जुंपल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App