वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व भारताला मिळायला हवे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडेन यांची द्विपक्षीय बैठक झाली. त्यावेळी बायडेन यांनी हे प्रतिपादन केले, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शांग्रीला यांनी दिली. President Biden feels India should have permanent seat in UNSC: MEA
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत सध्या फक्त पाच कायमचे सदस्य आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशिया या देशांना या देशांकडे सुरक्षा समितीची सूत्रे आहेत. भारताला आतापर्यंत फक्त सात वेळा वर्षभरासाठी सुरक्षा समितीचे सदस्यत्व मिळाले आहे.
प्रत्यक्षात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना चीनच्या आधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या कायमच्या सदस्यत्वाची आशियाई देशांचे प्रतिनिधी म्हणून ऑफर आली होती. परंतु नेहरूंनी ती ऑफर नाकारली आणि चीनला ती संधी मिळवून दिली. हा इतिहास आहे. कायमच्या सदस्यांना नकाराधिकार (व्हेटो) असतो. त्यामुळे त्यांना अनेक विषय रोखून धरता येतात तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांवर दबाव ठेवता येतो.
या पार्श्वभूमीवर सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व अतिशय महत्वाचे आहे. भारत 1990 च्या दशकापासून त्यासाठी प्रयत्न करतो आहे. विकसित देशांचे राष्ट्राध्यक्ष नेहमीच भारताच्या कायमच या सदस्यत्वासाठी तोंडी पाठिंबा देताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या कृतीमध्ये मात्र तफावत दिसते. आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जरी भारताच्या सुरक्षा समजल्या कायमच्या सदस्यत्वाविषयी भाष्य केले असले तरी प्रत्यक्षात अमेरिकेची कृती कशी असेल याविषयी मात्र शंका आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App