अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरे आणि कार्यालयांची आयकर अधिकाऱ्याकडून झडती घेतली जात असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.ED Raid: Ajit Pawar’s difficulty increases! ED’s direct raid on nearby property
विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी (दि.७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरे आणि कार्यालयांची आयकर अधिकाऱ्याकडून झडती घेतली जात असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.
यात जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर, आंबलिक शुगर , पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.
ईडी अथवा आयकर विभाग यापैकी एका विभागाकडून ही चौकशी सुरु आहे. यासंबधी अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना किरीट सोमय्यांनी ‘चॅलेंज’ केले होते. त्यांच्या आरोपामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं.
सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे समजते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ही छापेमारी सुरु झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App