Earthquake In Pakistan : रिश्टर स्केलवर 6.0 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला पाकिस्तान, 20 जण ठार, 300 हून अधिक जखमी


पाकिस्तानच्या हरनाई भागात आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे 300 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. भूकंप खूप तीव्र होता, जवळपासच्या अनेक जिल्ह्यात नुकसान झाल्याची माहिती आहे. 6 magnitude earthquake hits pakistans harnai 15 killed


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या हरनाई भागात आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे 300 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. भूकंप खूप तीव्र होता, जवळपासच्या अनेक जिल्ह्यात नुकसान झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तानच्या हरनाई भागात आज पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचे हादरे पहाटे ३.३० वाजता जाणवले आहेत. हरनाई पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये येतो. लोकांना मदत आणि बचाव करण्यासाठी जड यंत्रसामग्री क्वेट्टा येथून रवाना करण्यात आली. सध्या हरणाई येथील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

हॉस्पिटलमध्ये मोबाईल टॉर्चने काम

पाकिस्तानी माध्यमांकडून येणाऱ्या व्हिज्युअल्सनुसार, हरनाईतील रुग्णालयांमध्ये वीज नाही. तेथे जखमी लोकांचे नातेवाईक मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार घेत आहेत.अधिकाऱ्यांच्या मते, भूकंपाचा प्रभाव अनेक जिल्ह्यांमध्ये आहे, त्यामुळे जखमींची नेमकी संख्या सांगणे शक्य नाही.

का होतो भूकंप?

पृथ्वी अनेक स्तरांमध्ये विभागलेली आहे. जमिनीखाली अनेक प्रकारच्या प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकत्र अडकल्या आहेत, परंतु काही वेळा या प्लेट्स घसरतात, ज्यामुळे भूकंप होतो. कधीकधी त्या अधिक कंपित होतात आणि त्याची तीव्रता वाढते. भारतात पृथ्वीच्या आतील थरांमध्ये भौगोलिक हालचालीच्या आधारे काही झोन ​​निश्चित केले गेले आहेत आणि काही ठिकाणी ते जास्त आणि काही ठिकाणी कमी आहेत.

या शक्यतांच्या आधारावर, भारताला 5 झोनमध्ये विभागले गेले आहे. यावरून भारतात भूकंप होण्याची सर्वाधिक शक्यता कुठे आहे हे कळते. यात झोन -5 मध्ये भूकंप होण्याची सर्वाधिक शक्यता असते, तर झोन 4 मध्ये त्याहून कमी असते.

6 magnitude earthquake hits pakistans harnai 15 killed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”