अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी कोल्हापुरात पूजाअर्चा करून आकर्षक सजावट

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवाच्या मुहूर्तावर आज कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर देखील उघडण्यात आले आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना दर्शन घेण्यास अनुमती दिल्यानंतर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत आहे.Temple of Tulja Bhavani Decoreted with Nice flowers

श्री अंबाबाई मंदिराची द्वारे आज पहाटे पाच वाजता उघडण्यात आली. श्री अंबाबाईची विविध पूजाअर्चा करून मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामध्ये हजारो डझन फळे-फुले याचा वापर केला आहे. आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या.

भाविकांना ऑनलाईन पासवर दर्शन मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर भाविकांची तपासणी सॅनिटायझर या सर्व गोष्टींचे कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

– अंबाबाई मंदिराची द्वारे आज पहाटे उघडली

– विधिवत पूजाअर्चा करून भाविकांना मंदिर खुले

– अंबाबाईच्या मंदिरात भाविकांची गर्दी

– मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

– हजारो डझन फळे-फुले याचा वापर

– सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रिघ

Temple of Tulja Bhavani Decoreted with Nice flowers