आंदोलकांना हत्येद्वारे शांत केले जाऊ शकत नाही : भाजप खासदार वरुण गांधी

लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसह पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती.Protesters cannot be silenced by assassination: BJP MP Varun Gandhi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लखीमपूरमध्ये तीन ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक ट्विट केली आहेत.वरुण गांधींनी लखीमपूर घटनेचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की , आंदोलकांची हत्या करून त्यांना गप्प बसवलं जाऊ शकत नाही. निष्पाप शेतकऱ्यांचे जे रक्त वाहिले आहे त्याला जबाबदार कोण आहे ? पीडितांना न्याय मिळायलाच हवा. शेतकऱ्यांमध्ये असा संदेश जायला नको की आपण क्रूर आहे.याआधी वरून गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चिरडण्याचा हा व्हिडिओ पाहून कोणाचही मन सुन्न होईल. पोलिसांनी या व्हिडिओवरून गाडी मालक आणि त्यात बसेलल्या लोकांसह सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

ट्विटर अकाऊंटच्या बायोमधून ‘भाजप’ शब्द काढला

भाजप खासदार वरुण गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमधून ‘भाजप’ हा शब्द काढून टाकला आहे.

योगींना लिहिले पत्र

वरुण गांधी यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसह पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती.वरुण गांधी यांनी भविष्यात शेतकऱ्यांवर असा अन्याय किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अतिरेक होणार नाही याची खात्री मुख्यमंत्री योगींनी द्यावी असेही ते म्हणाले आहेत.

Protesters cannot be silenced by assassination: BJP MP Varun Gandhi

महत्त्वाच्या बातम्या