फडणवीसांच्या एकाच पत्राने अख्खी राष्ट्रवादी कोंडीत; अजितदादांची “दादागिरी” महायुतीत मोडीत!!


नाशिक : नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात नवाब मलिकांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्याच्या एका कृतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे एकच पत्र लिहिले त्यामुळे महाराष्ट्रात काय खळबळ उडायची ती उडो, संजय राऊत, जयंत पाटील यांच्यासारखे “माध्यमवीर” काय बोलायचे ते बोलोत, त्यामुळे त्या पत्राचा खरा परिणाम बदलत नाही. कारण फडणवीस यांच्या एका पत्राने नुसती अख्ख्या राष्ट्रवादीची कोंडीच केली असे नाही, तर अजितदादांची “दादागिरी” खऱ्या अर्थाने महायुतीत मोडीत काढली आहे. Devendra fadnavis totally broke dominance of ajit pawar in mahayuti government

फडणवीसांच्या त्या पत्राने अजितदादांना खरे तर राष्ट्रवादीत सफाई करण्याची संधी दिली, त्याचवेळी महायुतीत भाजपच दादा असल्याचे देखील दाखवून दिले. पण त्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील एक विशिष्ट इशारा देऊन आपली बाजू उचलून धरायला भाग पाडले आहे.

एकतर शिंदे – फडणवीस यांची हिंदुत्ववादाची भूमिका एक आहे. त्यामुळे त्यांनी नवाब मलिक मुद्द्यावर एकत्र येणे स्वाभाविक होते, तसे ते आलेही. उलट एकनाथ शिंदेंनी नवाब मलिकांच्या निमित्ताने आपल्याच आधीच्या महाविकास आघाडीतल्या सहकार्यांना सुनावून घेतले. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी नाकाने कांदे सोडण्याचे कारण नाही. कारण नवाब मलिक तुरुंगात असताना देखील त्यांच्या मंत्रिमंडळात ते कायम होते. त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली नव्हती, याची आठवण एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना करून दिली.

बाकी संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांच्या पत्राविरोधात त्यांना टोले हाणण्याचा प्रयत्न केला. त्यातही संजय राऊत यांनी प्रफुल्ल एकट्या नवाब मलिकांनाच का टार्गेट करता??, प्रफुल्ल पटेल यांचे देखील दाऊदशी संबंध होते, मग त्यांना टार्गेट का नाही करत??, असा सवाल करून आपण फडणवीसांची कोंडी करत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात नवाब मलिकांपाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांनी फडणवीसांपेक्षा राष्ट्रवादीचीच कोंडी केली.

पण संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांनी टीका करूनही फडणवीस एका शब्दानेही बोललेले नाहीत. वास्तविक आज नागपुरातल्या एका कार्यक्रमात फडणवीसांच्या समवेत प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. पण तिथे पत्रकारांना बाईट देताना फडणवीसांनी “नवाब मलिक” या प्रश्नावर एकही शब्द उच्चारला नाही, हे इथे आवर्जून नोंदविले पाहिजे. याचा अर्थ पत्र लिहून जे काही साध्य करायचे ते झाले आहे, आता त्यावर बोलण्यात मतलब नाही, हेच फडणवीसांनी मौनातून सूचित केले.

या सगळ्या राजकीय घमासानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनातली खरी खंत अजितदादा गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तोंडून बाहेर आली. फडणवीसांनी ते पत्र प्रसार माध्यमांना द्यायला नको होते, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. यातूनच राष्ट्रवादीची सत्तेत गेल्यानंतरही कशी राजकीय दृष्ट्या कुचंबलेली आहे, याची खरी खंत उघड्यावर आली.

अजितदादांची “दादागिरी”ची प्रतिमा

महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता होती किंवा महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी अजित पवारांची मंत्रिमंडळात “दादागिरी” चालायची. मराठी प्रसार माध्यमांनी देखील अजित पवारांची प्रतिमा मंत्रिमंडळातले “खरे दादा” अशीच तयार केली होती. दादांचा स्वभाव परखड आहे, दादा धडाकेबाज निर्णय घेतात, काम होणार असेल तर होय, होणार नसेल तर नाही, असे ठाम सांगतात, अशा अजितदादा गुणप्रतिमा निर्मितीत मराठी माध्यमे आघाडीवर होती, पण फडणवीस यांच्या एका पत्राने अजितदादांची ती “दादागिरी” साफ मोडीत काढली.

नवाब मलिक यांना आता सत्ताधारी बाकावर बसवा किंवा बाजूला कुठेही बसवा त्यांना महायुतीत स्थान राहणार नाही, हे फडणवीस यांनी एका पत्रातून सांगून टाकले आणि राजकीय अपरिहार्यतेपोटी फडणवीसांची बाजू घेऊन एकनाथ शिंदेंनी देखील अजितदादांना महायुतीतल्या त्यांच्या तिसऱ्या स्थानावर ढकलून दिले.

– अजितदादा मुख्यमंत्री होणार होते, पण…

नवाब मलिक प्रकरणात फडणवीसांनी पत्र लिहिण्यापूर्वी प्रसार माध्यमांनी अजितदादांची महायुती सरकार मधली प्रतिमा देखील मंत्रिमंडळातले “दादा” अशीच रंगवली होती. एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून भाजप अजित पवारांनाच मुख्यमंत्री करणार, असे दावे माध्यमेच करीत होती. त्याला अर्थातच अजितदादा गटातून बौद्धिक इंधन पुरवठा केला जात होता. अजितदादांचे समर्थक भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची पोस्टर्स शहर आणि शहरोशहरी आणि रस्तोरस्ती लावत होते. पण फडणवीसांच्या त्या पत्राने अजितदादांची “दादागिरी” नुसती उतरवली नाही, तर अजित पवारांच्या पाठिंब्याची महायुतीला गरज नाही. ते त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर महायुतीत सामील झालेले नाहीत. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतील पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाची नव्हे तर तिसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष आहे आणि ते त्यांच्या मनानुसार किंवा मतानुसार महायुतीतले निर्णय घेऊ शकत नाहीत, असे ठणकावून सांगितले.

अजितदादांची “दादागिरी” बाकीच्या मंत्रिमंडळामध्ये चालत असेल, महायुतीच्या मंत्रिमंडळात ती “दादागिरी” चालणार नाही, हेच फडणवीसांनी या पत्रातून दाखवून दिले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अजितदादाच बॅकफूटवर आले आहेत. नवाब मलिक मौन बाळगून आहेत. पण त्यांना आत्ता बोलूनही चालणार नाहीत. कारण ते वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत आणि पुढच्या तीनच महिन्यांमध्ये सुप्रीम कोर्टात त्या जामिनावर पुढची सुनावणी होणार आहे. मलिकांच्या मौनाचे हे खरे “रहस्य” आहे!!

Devendra fadnavis totally broke dominance of ajit pawar in mahayuti government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात