विशेष प्रतिनिधी
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या लेटर बॉम्ब वर अजितदादा चिडले आणि तुम्हाला अधिकार दिला म्हणून कसेही वागणार का??, असा सवाल करून निघून गेले!!, नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान हे घडले. देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाऊन वैद्यकीय जामिनावर सुटून आलेले नवाब मलिक नागपूर अधिवेशनाला आले. विधानसभेत सत्ताधारी बाकांवर जाऊन मागे बसले. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना महायुतीतून “बाहेर” हाकलले. या मुद्द्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच अजितदादा चिडले.
याची कहाणी अशी :
नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिल्यानंतर अजितदादांची “दादागिरी” महायुतीच्या मंत्रिमंडळात पुरती उतरली. नवाब मलिक यांच्या संदर्भात आपण एकटेच निर्णय घेऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर अजित दादा बॅकफूटवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही, पण नेमका त्याच संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मात्र अजितदादा चिडले. नवाब मलिक यांना विधानसभेत कुठे बसवावे??, हा अधिकार माझा नाही. तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. खुद्द नवाब मलिकांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच त्यावर मी काही बोलेन, असे अजितदादा म्हणाले. परंतु फडणवीसांच्या पत्राला तुम्ही उत्तर दिले का??, दिले नसेल तर केव्हा देणार??, या प्रश्नावर मात्र अजितदादा चिडले. तुम्हाला अधिकार दिलाय म्हणून तुम्ही कसेही वागणार का??, मला जेव्हा उत्तर द्यायचे तेव्हा देईन, असे म्हणून अजितदादा तिथून निघून गेले.
भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात गुरुवारी लेटरबॉम्ब टाकला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पत्र लिहिले. त्या पत्रात मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यानंतर गुरुवारी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी यासंदर्भात मौन सोडले.
काय म्हणाले अजित पवार
देवेंद्र फडणवीस यांचे पत्र आपणास मिळाले आहे. आपण हे पत्र वाचले आहे. नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतर मी माझे मत देईन. आधी नवाब मलिक यांचे मत काय आहे, ते स्पष्ट कळू द्या, असे अजित पवार म्हणाले.
– अजितदादा चिडले
सभागृहात कोणी कुठे बसावे, हा माझा अधिकारी नाही. तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडवणीस यांना पाठिंबा दिला आहे, त्यावर पुन्हा अजित पवार यांनी त्या पत्राबद्दल मला जे करायचे ते मी करेन, हेच उत्तर दिले. मात्र पत्रकारांनी सारखा तोच विषय लावून धरल्यावर अजित पवार चिडले. तुम्हाला अधिकार दिला म्हणजे तुम्ही कसेही वागणार का??, असा सवाल त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App