देवेंद्र 24×7 सामाजिक कामात, पण त्याने स्वतःसाठी एक दिवस तरी द्यावा, वेड्या बहिणीची वेडी ही माया!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत, हे मान्य. पण देवेंद्र गेली कित्येक वर्षे 24×7 सामाजिक कामातच आहेत. ते कधीच विश्रांती घेत नाहीत त्यामुळे त्यांनी दोन-तीन महिन्यांत एक दिवस तरी स्वतःसाठी द्यावा. स्वतःसाठी जगावे, अशा शब्दांत वेड्या बहिणीने ही वेडी माया बोलून दाखविली. devendra fadnavis sister bhavana khare interview

देवेंद्र फडणवीस यांची थोरली बहीण भावना खरे यांची सोशल मीडिया इंफ्युएन्सर अभय माहेश्वरी यांनी खास मुलाखत घेतली. त्यावेळी भावनाताईंनी आपल्या मनातल्या भावना बोलून दाखविल्या. या मुलाखतीत भावनाताईंनी देवेंद्रजींच्या बालपणीच्या आठवणींपासून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडले.

फडणवीस कुटुंब हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातले. तिथे आजही त्यांचा वाडा आणि शेती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एकत्र कुटुंब पद्धतीत लहानाचे मोठे झाल्याने देवेंद्रजी अबालवृद्धांमध्ये सहजपणे मिसळून जातात आणि कृषी पासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सर्वच विषयांची जाण ठेवतात.

भावनाताईंनी गौरी-गणपती किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा संपूर्ण फडणवीस परिवार एकत्र यायचा तेव्हा १५ भावंडे एकाच वाड्यात एकत्र आल्याने घडणाऱ्या गमतीजमतींचे अनेक किस्से सांगितले. त्या म्हणाल्या, आपल्याला आठवत असेल की देवेंद्रजी एका वेळी ३५ पुरणपोळ्या सहज खातात, या अमृता फडणवीसांच्या वक्तव्याने संपूर्ण राज्यात अशी धमाल उडवून दिली होती, की प्रत्येक ठिकाणी मला पुरणपोळी अजिबात आवडत नाही, हे स्पष्टीकरण देताना देवेंद्रजींच्या नाकी नऊ आले होते. प्रत्यक्षात देवेंद्रजी ३५ पुरणपोळ्या खात नसले तरी त्यांनी बालपणी एकदा गणपतीची वेशभूषा करून २१ मोदक मात्र फस्त केले होते. मग त्याचा वचपा काढण्यासाठी फडणवीस भावंडं त्यांचे विसर्जन करायला वाड्यातील विहिरीवर सुद्धा घेऊन गेले होते. देवेंद्रजींना पुरणपोळी आवडत नसली तरी त्यांना ओल्या नारळाच्या करंज्या अतिशय आवडतात. देवेंद्रजींना चहा सुद्धा अत्यंत प्रिय असून बालपणी ते आपल्या ताईसोबत १६-१६ कप चहा सहज रिचवायचे, अशा आठवणी भावाला त्यांनी सांगितल्या.



देवेंद्रांचे गणित कच्चे पण राजकारण पक्के

देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण आज पक्के आहे. पण शाळेत मात्र त्यांचे गणित बिलकुलच कच्चे होते. गणिताचा आणि देवेंद्रजींचा 36 चा आकडा होता. पण ते एकपाठी असल्याने एका रात्रीत गणितचा अभ्यास करून ते पास होण्यापुरते गुण मिळवून पुढे सरकायचे. परंतु इतिहास, सामाजिक शास्त्र, न्याय व विधी अशा अन्य सर्वच विषयात देवेंद्रजींना उत्तम गुण मिळायचे. ते पुस्तकी किडा नाहीत पण त्यांना वाचनाची मात्र प्रचंड आवड आहे. वर्तमानपत्र असो किंवा कुठली कादंबरी, फावल्या वेळात देवेंद्रजी सतत काही ना काही वाचत असतात. त्यामुळेच नेहमी ‘अभ्यासोनि प्रकटणाऱ्या’ देवेंद्रजींच्या भूमिका मोडून काढणे विरोधकांसाठी अशक्य असते. हातात पुरावा आणि सखोल अभ्यास केल्याशिवाय देवेंद्रजी कधीही कुणावर आरोप करत नाही. देवेंद्रजींच्या याच विजिगिषु वृत्तीमुळे त्यांनी घेतलेला संकल्प कायम तडीस जातो, कारण त्याला अभ्यास आणि मेहनतीची जोड असते, असे भावनाताईंनी आवर्जून सांगितले.

देवेंद्रजी बालपणापासूनच शांत, संयमी आणि पोक्त विचार करणारे आहेत. देवेंद्रजींनी वयाने लहान असूनही आपल्या मोठ्या भावंडांना त्यांनी भक्कम साथ दिली. शिवाय हिंदुत्वाबद्दल देवेंद्रजींना बालपणापासूनच प्रचंड आकर्षण होते, म्हणूनच वयाच्या १८ व्या वर्षांपासून देवेंद्रजींनी सलग ३ वेळा अयोध्येत जाऊन कारसेवा केली, पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तुरुंगवासही भोगला. एवढेच नव्हे तर लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात काश्मिरातील लाल चौकात तिरंगा फडकविण्याच्या आंदोलनातही देवेंद्रजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता म्हणून श्रीनगरला गेले होते. त्यामुळे वरपक्षी शांत आणि मवाळ भासणारे देवेंद्र आपल्या विचारांप्रती तितकेच कडवट आणि आक्रमकही आहेत. म्हणूनच नगरसेवक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा प्रवास गाठणाऱ्या या लोकनेत्याच्या कपड्यांवर भ्रष्टाचाराचा एकही डाग दिसत नाही. आपले संस्कार, आपले विचार, आपला धर्माभिमान आणि आपली सज्जनता यांमुळे राजकारणाच्या दलदलीतही देवेंद्रजींचे कर्तृत्व कमळाप्रमाणे फुलले.

देवेंद्रजींच्या राजकीय कर्तृत्वाचे वर्णन भावनाताईंनी केले तरी मुलाखतीत त्यांनी आपल्या या कर्तृत्ववान भावाला प्रेमळ सल्लाही दिला. राजकारणात आल्यापासून देवेंद्रजी 24×7 सार्वजनिक जीवनात काम करतात. पण त्यांना व्यक्तिगत जीवनात लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. असा वेळ कुठे उपलब्ध नसतो तो स्वतःसाठी काढून किंवा राखून ठेवावा लागतो तो देवेंद्रजींनी राखून ठेवावा दोन-तीन महिन्यांमधून एक दिवस तरी स्वतःसाठी जगावे स्वतःची काळजी घ्यावी स्वतःच्या आवडीनिवडी जोपासाव्यात थोडी विश्रांती घ्यावी असा प्रेमळ ताईचा सल्ला त्यांनी ऐकावा, असे भावनाताई म्हणाल्या.

devendra fadnavis sister bhavana khare interview

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात