”कॅनडा भारताला चिथावण्याचा प्रयत्न करत नाही, पण…” वाढत्या तणावानंतर जस्टिन ट्रूडोंचं विधान!


भारत सरकारने कॅनडाच्या उच्चआयुक्ताची  हकालपट्टी केली आहे.

विशेष प्रतिनिधी

ओटावा : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत गंभीर आरोप झाल्यानंतर भारताने प्रत्युत्तराची पावले उचलली. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आले आहेत. Canada is not trying to provoke India  Justin Trudeau

जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी कॅनडाच्या संसदेत दिलेल्या आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी  जोडलेले असणाऱ्या एजंटांवरून कॅनडा भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु भारताने हा मुद्दा योग्य प्रकारे हाताळावा अशी आमची इच्छा आहे.”

जस्टिन ट्रूडो यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “भारत सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आम्ही ते करत आहोत, आम्ही चिथावणी देण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न करत नाही.” तत्पूर्वी, भारताने कॅनडाच्या सरकारचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते आणि ते अर्थहीन असल्याचे म्हटले होते. यासोबतच भारत सरकारने कॅनडाच्या उच्चआयुक्ताची  हकालपट्टी केली आहे. त्यांना देश सोडण्यासाठी ५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो काय म्हणाले? –

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खासदारांना सांगितले की, “कॅनडाच्या भूमीवर एका नागरिकाच्या हत्येमध्ये परदेशी सरकारचा सहभाग हे आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. या हत्येच्या तपासात सहकार्य करण्यासाठी आम्ही भारत सरकारवर दबाव आणू.”

याशिवाय जस्टिन ट्रुडो म्हणाले “कॅनडामध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या शिखांची मोठी लोकसंख्या या हत्येमुळे संतप्त आहे. अनेक शीख त्यांच्या सुरक्षेसाठी घाबरले आहेत. देशात 14 ते 18 लाख भारतीय वंशाचे नागरिक आहेत, त्यापैकी बरेच शीख आहेत. कॅनडाच्या विरोधी न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जगमीत सिंग हे शीख समुदायातील आहेत.

Canada is not trying to provoke India  Justin Trudeau

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात