विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra fadnavis एखाद्याचा किमान शब्दांत कमाल “उल्लेख” करणे, हे आवली पुणेकरांचे वैशिष्ट्य पुलंनी आपल्या तुम्हाला पुणेकर व्हायचे, नागपूरकर की मुंबईकर??, या कथाकथनात टिपले. पण “किमान शब्दांत कमाल “उल्लेख” करायच्या या गुणामध्ये एका नागपूरकराने पुणेकरांवरही मात करून दाखवली. नागपूरकर देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis यांनी किमान शब्दांमध्ये कमाल “उल्लेख” करत ठाकरे + पवारांचे वर्णन केले. निमित्त होते, लोकमतच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीचे!!
राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये रंगलेल्या या मुलाखतीत जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना अनेक टोकदार प्रश्न विचारले. पण देवेंद्र फडणवीस यांनी फुल्ल बॅटिंग करत ते प्रश्न टोलवले. तुम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे दोन वाक्यांमध्ये काय आणि कसे वर्णन कराल??, असा सवाल जयंत पाटलांनी केला. त्यावर फडणवीसांनी दोन वाक्यांत नव्हे, एकाच वाक्यात सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. “काही भरवसा नाही”, या एकाच वाक्यात ठाकरे आणि पवारांच्या वर्तणुकीचे वर्णन करता येईल, असे फडणवीस म्हणाले. या एका वाक्यात नागपूरकर फडणवीस यांनी किमान शब्दांत कमाल “उल्लेख” करायच्या या गुणामध्ये पुणेकरांवरही मात केली. Devendra fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वयाच्या 75 व्या वर्षी भाजपचे नेत्याने कार्यकर्ते निवृत्त होऊ देणार नाहीत. कारण ते अजून फिट आहेत. २०२९ नंतर देखील त्यांनीच पंतप्रधान व्हावे, अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे, असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याचा आणि मर्यादांचाही स्पष्ट उल्लेख केला. मी काही दिल्लीकडे डोळा लावून बसलेलो नाही त्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडू, असे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App