यह एक चिराग कई आँधीयों पे भारी है!!; देवेंद्र फडणवीसांचा टोला धनंजय मुंडेंना, पण निशाणा पवारांवर!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला कवी जागा झाला. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी कवितांचे बाण सोडले.Devendra Fadanavis targets pinched dhananjay munde, but sarcastically targets sharad Pawar during his Budget speech

एरवी विधानसभेच्या सभागृहात प्रत्येक मुद्द्याचे टिपण काढत शांत बसणाऱ्या, संयमी स्वभावाच्या देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना कवितांची फटकेबाजी केली. फडणवीस म्हणाले, ‘मुश्किलें जरुर है मगर, ठहरा नही हूँ मैं… मंजिलों से कह दो अभी पहुँचा नही हूँ मैं…’



राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडेंनी हा अर्थसंकल्प कॉपी, एडिट, पेस्ट वाटला, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हा कॉपी, एडिट, पेस्ट नाही… हा कंट्रोल, अल्टर, शिफ्ट अर्थसंकल्प आहे. धनंजय मुंडे काय म्हणाले होते,

‘इत्र सें कपडो को महकाना कोई बडी बात नही,

मजा तो तब है, जब आपके किरदार से खुशबू आए…’

मी त्यांना एवढेच सांगतो.

‘दुआ करो कि सलामत रहे मेरी हिंमत

यह एक चिराग कई आँधियों पे भारी है.

मुश्किलें जरुर है मगर, ठहरा नही हूँ मैं…

मंजिलों से कह दो अभी पहुँचा नही हूँ मैं…’

फडणवीस यांनी हा शेर सादर करून टोला धनंजय मुंडेंना टोला जरूर हाणला. पण त्यांचा निशाणा मात्र थेट शरद पवारांवर होता. कारण त्यांच्याच आँधीने फडणवीस नावाच्या चिरागावर बिलामत आणली होती. पण या चिरागाने त्या आँधीवर मात करून दाखविली.

 जयंत पाटलांना टोला

जयंत पाटलांच्या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, जयंतराव तुम्ही सूर्यकांत डोळस यांच्या मोजक्या दोन वात्रटिका वाचलेल्या दिसतात. त्यांच्या काही वात्रटिका तुमच्याही काळात आल्या होत्या. त्यातील एक वाचून दाखवितो…

दोघांमध्ये तिसरा आला

सांगा कोण कुणाचा लव्हर आहे?

नेमकेचि बोलायचे तर,

प्रेमग्रंथाला भगवे कव्हर आहे…

तिघाडीची झाली आघाडी

तीन-तीन हायकमांड आहेत.

देशी-विदेशी झाले कालबाह्य

बदलत्या काळाच्या,

बदलत्या डिमांड आहेत…!!

Devendra Fadanavis targets pinched dhananjay munde, but sarcastically targets sharad Pawar during his Budget speech

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात