पुण्यात उपायुक्ताला १ लाख ९० हजारांची लाच घेताना अटक; लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई


विशेष प्रतिनिधी

पुणे : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्ताला १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. या कारवाईमुळे लाचखोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. Deputy Commissioner arrested in Pune for accepting bribe of Rs 1 lakh 90 thousand

नितीन चंद्रकांत ढगे (वय ४० ), असे पकडलेल्या उपायुक्ताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपायुक्त आहेत. तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्यदेखील आहेत.



दरम्यान तक्रारदाराने त्याच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी नितीन ढगे याने तक्रारदाराकडे  ८ लाख रुपयांची लाच मागितली.याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीनुसार एसीबीने सापळा रचला. नंतर नितीन ढगे याला १ लाख ९० हजार रुपये घेताना पकडले. सध्या उपायुक्त एसीबीच्या ताब्यात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Deputy Commissioner arrested in Pune for accepting bribe of Rs 1 lakh 90 thousand

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात