ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर!; पहिली फेरी जिंकली, पण पुढे काय?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच होणार आहे. अर्थातच मुंबई हायकोर्टाने निर्णय दिल्यामुळे ठाकरे गटात अतिशय उत्साहाचे उधाण आले आहे. शिंदे गटावर विरुद्धची कोर्टातली पहिली फेरी ठाकरे गटाने जिंकल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. Dasra rally of Thackeray faction will be on Shivaji park, Mumbai high court gave verdict, but the further battle will be in Supreme Court

ठाकरे गटाला परवानगी देताना मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे. याचा अर्थ कोर्टाने ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या शिवतीर्थासंदर्भातल्या दोन याचिका वेगवेगळ्या ठरवून निकाल दिला आहे.

हा मुद्दा बारकाईने समजून घेतला पाहिजे. विषय एकच असला, तरी याचिका एकत्र करायच्या आणि सुनावणी एकत्र एकच घ्यायची की स्वतंत्रपणे याचिका सुनावणीला घ्यायच्या, हा सर्वस्वी अधिकार कोर्टाचा आहे आणि तो मुंबई हायकोर्टाने शिवतीर्थाच्या संदर्भात वापरला आहे.

या पुढची लढाई मात्र केवळ मुंबई हायकोर्टापुरती मर्यादित नाही, तर ती थेट सुप्रीम कोर्टातली लढाई आहे आणि ती शिवसेनेच्या मूळ नावाच्या अस्तित्वाबाबत आणि शिवसेनेच्या मूळ धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत असणार आहे.



हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत दोन्ही गटांच्या याचिका स्वतंत्रपणे दाखल आहेत. शिवतीर्थाच्या संदर्भात आजचा निर्णय देताना मुंबई हायकोर्टाने दोन स्वतंत्र याचिका आहेत, असे गृहीत धरून ठाकरे गटाच्या याचिकेवर निर्णय दिला आहे.

सुप्रीम कोर्ट मात्र शिवसेनेच्या निवडणूक निवडणूक चिन्ह याबाबतची याचिका आणि मूळ नावाबाबतची याचिका स्वतंत्रपणे सुनावणी योग्य मानते की विषय एकच आहे म्हणून एकत्रित सुनावणी घेऊन निर्णय देते, यावर बऱ्याच कायदेशीर गोष्टी अवलंबून आहेत.

या अर्थाने आज ठाकरे गटाने मुंबई हायकोर्टातील लढाईची पहिली फेरी जिंकली असली तरी सुप्रीम कोर्टातल्या लढाईत पुढच्या फेऱ्या मात्र अजूनही खुल्या आहेत. तेथे दोन्ही गटांना स्वतंत्रपणे कायदेशीर डावपेच लढवावे लागणार आहेत. आजच्या शिवतीर्था संदर्भातील याचिकेवर मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाचा हा राजकीय धडा आहे!!

Dasra rally of Thackeray faction will be on Shivaji park, Mumbai high court gave verdict, but the further battle will be in Supreme Court

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात