विशेष प्रतिनिधी
कट्टरतावादी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर काल देशभरात एनआयए आणि ईडीने कायद्याचा बडगा चालविल्यानंतर उत्तरेतील काही मुस्लिम संघटनांनी या कायदेशीर कारवाईचे स्वागत केलेले दिसले पण केरळमध्ये मात्र या कायदेशीर कारवाईचे हिंसक पडसाद उमटले. याचे “रहस्य” शोधायला फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करायची गरज नाही. कट्टरतावादी मानसिकतेच्या अभ्यासातून ही बाब अधिक स्पष्ट होईल. किंबहुना या कट्टरतावादी संघटनांची मायावी रूपे नावे बदलून अनेकदा समोर आली आहेत, ती पाहिली तरी यातले “रहस्य” सर्वसामान्यांना उलगडेल!! Islamic fundamentalist organisations changed their names to democratic parties alike, but their fundamental intentions remain the same of Jihad
PFI बंदीची भाषा पण…
22 सप्टेंबर 2022 च्या देशभरातल्या छाप्यानंतर PFI संघटनेवर बंदीची भाषा आता सुरू झाली आहे. जशी बंदी स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात SIMI संघटनेवर घातली होती, तशीच बंदी कदाचित PFI वर येईल देखील… पण म्हणून कट्टरतावाद्यांच्या कारवाया थांबतील असे समजणे हे केवळ स्वप्नरंजन ठरू शकते!!
मोपल्यांचे हिंदूंवर अत्याचार
कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे कट्टरतावादी संघटना अनेकदा नावे बदलून विविध मायावी रूपे धारण करताना दिसल्या आहेत आणि त्याची पाळेमुळे अगदी 1921 सालच्या मोपला बंडात देखील दिसली आहेत. प्रत्यक्षात केरळ मधल्या मलबार प्रांतातील मधल्या मोपला मुसलमानांचे बंड हा संपूर्ण हिंदू समाजाविरुद्धचा जिहाद होता. मोपला दहशतवाद्यांनी मलबार मध्ये हजारो हिंदूंचे बळी घेतले. हजारो हिंदूंना तलवारीच्या जोरावर इस्लाम कबूल करायला भाग पाडले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी “मोपल्यांचे बंड” या कादंबरीतून त्याचे स्वरूप तेव्हाच स्पष्ट केले होते. त्यानंतर देखील इतिहासाचे वास्तववादी संशोधन करणाऱ्या अनेक इतिहासकारांनी मोपला अत्याचाराच्या कहाण्या छापल्या आहेत पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी मोपल्यांच्या बंडाला ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याचे रूप देऊन मोपला बंडखोरांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून दर्जा दिला होता. सन 2020 मध्ये हा दर्जा काढल्याचे दिसून येत आहे.
खाकसार, रझाकार
त्याचबरोबर संपूर्ण दक्षिण भारताचा विचार केला तर केवळ मोपला बंडखोरच नव्हे, तर हैदराबाद संस्थानांमधील खाकसार – रझाकार ही त्याचीच वेगळी मायावी रूपे होती. जिहादी मानसिकता हा या सर्वांचा मूलभूत विचाराचा घटक आहे. वास्तविक खाकसार ही संघटना इनायत उल्ला खान मशरकी यांनी लाहोर मध्ये स्थापन केली. तिचा प्राथमिक उद्देश ब्रिटिशांशी युद्ध करणे हा असल्याचे त्यावेळी सांगितले होते. पण ही संघटना अखंड भारतात बंदी घातल्यानंतर हैदराबाद संस्थानात फैलावली. तिचे राजकीय पक्षात रूपांतर केले गेले. हैदराबाद संस्थानात हिंदूंवरच्या अत्याचारांमध्ये खाकसार ही संघटना 1940 च्या दशकांमध्ये आघाडीवर होती. रझाकारांसारख्या हिंसक संघटनेला तिचा पाठिंबा सक्रिय होता.
सिमी संघटनेचा उदय, घातपाती कारवाया
1948 सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या पोलीस कारवाईनंतर मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि रझाकरांचा पराभव झाला. पण रझाकारांचा पराभव झाला असला तरी मूलभूत खाकसारी आणि रझाकारी प्रवृत्ती कधीच नष्ट झाल्या नाहीत. दक्षिण भारतातल्या हैदराबाद संस्थानच्या हद्दीत याच कट्टरतावादी प्रवृत्ती स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) SIMI संघटनेच्या नावाने ती पुन्हा उदयाला आली. कर्नाटकातल्या भटकळ गावात यासीन भटकळच्या रूपाने जुना हैदराबादचा रझाकरी कासीम रिझवी परत घातपाती कारवाया करू लागला…
त्या एवढ्या की थेट मालेगाव बॉम्बस्फोटापर्यंत त्याच्या तारा जोडल्या गेल्या. त्यावेळच्या सरकारमध्ये असलेल्या विशिष्ट प्रवृत्तींमुळे मालेगाव बॉम्बस्फोटाचा संबंध हा तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांची जोडला गेला. पण म्हणून फार काळ सत्य लपले नाही. मालेगावच काय पण मुंबई बॉम्बस्फोट आणि 2006 च्या दरम्यान झालेल्या दंगली यामध्ये देखील SIMI या कट्टरतावादी संघटनेचा हात असल्याचे सिद्ध झाले होते. SIMI वर त्यामुळेच तर बंदी घातली गेली. आज SIMI संघटना कायदेशीर दृष्ट्या बंदी घातले गेलेल्या संघटनांच्या यादीत समाविष्ट आहे. पण म्हणून SIMI ची मूलभूत कट्टरतावादी प्रवृत्ती मात्र नष्ट झालेली नाही. ती दक्षिणेतल्या प्रांतांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI च्या रूपाने पुन्हा उगवलेली दिसली आहे आणि आता त्या पुढे जाऊन SDPI सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षात देखील तिचे रूपांतर झाल्याचे दिसत आहे.
नाव लोकशाहीवादी काम कट्टरतावादी
वर उल्लेख केलेल्या सर्व कट्टरतावादी इस्लामी संघटनांचे दुसरे वैशिष्ट्य असे, की सुरुवातीच्या काळात त्यांची नावे उघडपणे इस्लामशी संलग्न असायची. मोपला, खाकसार, रझाकार या नावांमधून या संघटना नेमक्या कोणाशी आणि कशाशी संबंधित आहेत, याचा खुलासा व्हायचा. पण कट्टरतावादी मायावी विचारसरणीने नंतर अशा पद्धतीने स्वतःचे रूपांतर करून घेतले, की ज्याच्या नावामधून मूळ उद्देशाचा खुलासाच होता कामा नये!! त्यामुळे मग पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI, सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया SDPI अशी नावे या कट्टरतावादी संघटनांनी स्वतःला घेतली. याचा अर्थ, “कारवाया घातपातीच, पण नावे मात्र लोकशाहीवादी” हेच ते इस्लामी कट्टरतावादी संघटनांचे मायावी रूप राहिलेले दिसून येत आहे!!
बंदी आली तरी…
PFI सारख्या संघटनेवर नजीकच्या भविष्यात बंदी आली तरी कट्टरतावाद्यांचा नावे बदलण्याचा हा नवा पॅटर्न लक्षात घेतला तर त्यामध्ये असलेली मूलभूत कट्टरतावादी प्रवृत्ती PFI ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी लोकशाहीवादी नावाने पुढील येऊ घातल्यास आश्चर्य वाटायला नको… सावधानतेची जी नजर ठेवायची, ती त्या मायावी रूपावर ठेवली पाहिजे…!!… कठोर कायदेशीर कारवाईचे दोर आणखी करकचून आवळले पाहिजेत!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App