विशेष प्रतिनिधि
दसरा मेळाव्यापासून सुप्रीम कोर्टापर्यंतच्या स्वअस्तित्वाच्या झगड्यापर्यंत शिवसेनेचे दोन गट एकमेकांशी झुंजताना त्यांचे राजकीय अवलंबित्व मात्र आपापल्या मित्र पक्षांवर राहणार आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या संघर्षातून ही बाब जास्त अधोरेखित होताना दिसत आहेत.Dasra rally : fight between Shivsena Thackeray faction and shinde faction prove increas in political might of NCP and BJP
मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्याचा निकाल ठाकरे गटाला अनुकूल दिल्यानंतर ठाकरे गटात आनंदाचे उधाण येणे स्वाभाविक आहे. पण शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याचा हा निकाल येताच, शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते अंकुश काकडे यांनी आपल्या फेसबुक वॉल वरून केले आहे. अशा पद्धतीचे दुसऱ्या पक्षाचा मेळावा यशस्वी करण्यासाठी तिसऱ्याच पक्षाने आवाहन करणे हे प्रथमच घडताना दिसत आहे!!
आत्तापर्यंत ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतः पिछाडीवर राहून वेगवेगळ्या मेळाव्यांसाठी मदत करत असल्याचे आरोप शिंदे गट आणि भाजपचे नेते करतच होते. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेनिमित्त अनेकदा हे आरोप झाले होते. पण आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा यशस्वी करण्याची अधिकृत जबाबदारी जणू आपलीच आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ठाणल्याचे दिसत आहे!! अंकुश काकडे यांची फेसबुक वॉल तरी तसेच बोलत आहे!!
याचा दुसरा अर्थ असा की, शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शिवतीर्थावरचा मेळावा जर यशस्वी झाला, तर त्या यशस्वीतेत राजकीय वाटा मागायला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मोकळे राहणार आहेत. शिवाय ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीची रसद होती म्हणूनच तो यशस्वी झाला, असा आरोप करायला शिंदे गट आणि भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःहून वाव करून दिला आहे!! एक प्रकारे शिवसेनेच्या ठाकरे गटाला हे राजकीय डिवचणे असणार आहे.
दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाला बीकेसी मधल्या मेळाव्यात भाजपच्या थेट रसदीची गरज असण्याची शक्यता नाही. पण मूळातच शिंदे गट हा आमदार संख्येने लहान असल्याने राजकीय दृष्ट्या तो मोठा मित्र पक्ष भाजपवर अवलंबून आहे.
शिवसैनिकांची ताकद तीच, पण…
नजीकच्या भूतकाळात आपल्या मित्र पक्षापेक्षा सर्व बाबतीत मोठा असणारा अखंड शिवसेना पक्ष आज दुभंगल्यानंतर मित्र पक्षांवर रसदीसाठी अवलंबून राहात असल्याचे दिसत आहे. ही वेळ अन्य कोणाही पेक्षा शिवसेना नेतृत्वाने स्वतःवर आणल्याचे दिसत आहे. यात शिवसैनिकांच्या ताकदीचा अजिबात संबंध नाही. शिवसैनिकांची ताकद अजिबात कुठे कमी झाल्याचे दिसत नाही. दोन्ही गटांमधल्या शिवसैनिकांची ताकद संघटनात्मक पातळीवर तितकीच मजबूत आहे, हे दोन्ही गटांच्या आत्तापर्यंत झालेल्या मेळाव्यांवरून स्पष्ट होते. पण दोन्ही गटांच्या नेत्यांची राजकीय मुत्सद्देगिरी मात्र मित्र पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या मुत्सद्देगिरीवर विसंबून राहिल्याने ही अवस्था शिवसेना नावाच्या अखंड पक्षावर ओढवली आहे. याचा खरा अर्थ शिवसेनेच्या दोन गटात झुंज आणि मित्र पक्षांमध्ये सेनेची मूळ ताकद घटल्याचा आणि आपली ताकद वाढल्याचा आनंद!!, असा होतो आहे!!… दसरा मेळाव्याच्या संघर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर आलेली ही राजकीय वस्तुस्थिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App