शिवसेनेचे डॅमेज आऊट ऑफ कंट्रोल; पण पार्थ चटर्जी एपिसोड घडताच ममता बॅनर्जींचे डॅमेज कंट्रोल!!; 9 नवे मंत्री!!


विनायक ढेरे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची अनेक जण प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर तुलना करत असतात. पण दोन्ही नेतृत्वांमधला मूलभूत फरक आता समोर आला आहे… महाराष्ट्रात शिवसेनेचे डॅमेज हे विदाऊट आणि आऊट ऑफ कंट्रोल झाले आहे, तर पश्चिम बंगाल मध्ये पार्थ चॅटर्जी यांचा एपिसोड घडताच ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन आजच मंत्रिमंडळ विस्तार करून राजकीय डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करून बाबुल सुप्रियो यांच्यासह 9 मंत्र्यांना समाविष्ट केले आहे. जुन्या मंत्र्यांची खाती बदलून नव्या मंत्र्यांना त्या देणार आहेत. एक प्रकारे पश्चिम बंगाल मधले तृणमूळ काँग्रेस मधले हे “राजकीय ओव्हरऑईलिंग” आहे. Mamata Banerjee made political damage control better than Uddhav Thackeray; made 9 nine new ministers after arrest of parth chatterjee

शिक्षक भरती घोटाळ्यामुळे फेरबदल

ममता बॅनर्जी यांची तिसरी टर्म सुरू होऊन वर्षभर पूर्ण होऊन गेले आहे आणि तेवढ्यात पार्थ चॅटर्जी यांचा शिक्षक भरती घोटाळा बाहेर येऊन ईडीने त्यांना अटक केली आहे. ममता बॅनर्जी यांनी ताबडतोब पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला. तृणामूळ काँग्रेसच्या सर्व पदावरून त्यांना हटवून टाकले आणि पक्षात मूळापासून हात घालत बदल घडवत राजकीय डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे. बाबुल सुप्रियो यांच्यासारख्या भाजपमधून आलेल्या लोकप्रिय नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन आपले राजकीय इरादे स्पष्ट केले आहेत. भाजपशी पश्चिम बंगाल मध्ये टक्कर घेताना ममता बॅनर्जी यांनी नवे धोरण आखल्याचाच हा परिणाम आहे. शिवाय त्या पश्चिम बंगाल मध्ये 7 नवे जिल्हे बनवणार आहेत. ज्यामध्ये अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायाच्या प्राबलल्याचे ते जिल्हे असतील. ममता बॅनर्जी यांना राजकीय लाभ देणारा हा निर्णय असणार आहे.

 उद्धव ठाकरे अजूनही घरातच

म्हणजे एकीकडे ममता बॅनर्जी पार्थ चॅटर्जी यांचा राज शिक्षक भरती घोटाळा त्यानंतर ईडीची अटक हा एपिसोड घडल्याचा लाभ उठवत स्वतःच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये अमुलाग्र बदल करतात. भाजपशी टक्कर घ्यायला राजकीय दृष्ट्या पुन्हा तयार होतात, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र शिवसेनेचे डॅमेज विदाऊट आणि आऊट ऑफ कंट्रोल होऊन देखील उद्धव ठाकरे मात्र मातोश्री बाहेर पडायला तयार नाहीत. 2.5 वर्षात ते मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी आमदारांनी आणि शिवसैनिकांनी आमचे मुख्यमंत्री घरात बसतात. निधी वाटपात आमच्यावर अन्याय होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पोखरती आहे, अशा तक्रारी करून झाल्या. पण उद्धव ठाकरे ढिम्म जागचे हलले नाहीत. शिवसेनेचे 40 आमदार फुटले. सरकार गेले. नवे सरकार आले. नवीन सरकारला महिना उलटला तरी उद्धव ठाकरे एखाद दुसरा सार्वजनिक कार्यक्रम वगळता मातोश्रीच्या बाहेरच आलेले नाहीत. उरलेली सगळी शिवसेना मातोश्री भोवती त्यांनी फिरवत ठेवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटावर शाब्दिक हल्ले आणि नंतर मोटारींवरचे हल्ले यापेक्षा कोणतीही खऱ्या अर्थाने आपल्या शिवसेनेला बळ देईल अशी राजकीय कृती उद्धव ठाकरे यांनी केलेली नाही. रस्त्यावरच्या लढाईत आदित्य ठाकरे यांना त्यांनी जरूर पाठवले आहे. पण त्यांना सगळी रसद राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुरवत आहेत. कारण मूळचे शिवसैनिक आणि रस्त्यावर लढणारे शिवसैनिक शिंदे गटाकडे आहेत.


Shivsena – AAP : राणा दाम्पत्य – शिवसेना संघर्षात आम आदमी पार्टी शिवसेनेच्या पाठीशी!!


ममतांनी नाडी ओळखली

याचाच अर्थ असा की ममता बॅनर्जी राजकीय नाडी ओळखून आपल्या तृणामूळ काँग्रेसमध्ये बदल घडवतात मंत्रिमंडळात फेरबदल करतात आणि भाजपची टक्कर घ्यायला नव्याने सिद्ध होतात. पण उद्धव ठाकरे मात्र शिवसेना उभी फुटली तरी कोणतीही ठोस राजकीय हालचाल करताना दिसत नाहीत. हा महत्त्वाचा भेद ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातून दिसून येत आहे. पार्थ चॅटर्जी राजकीय दृष्ट्या अडचणीचे ठरू लागले. ईडी आपल्या घरापर्यंत येऊ लागली हे पाहूनच ममता बॅनर्जींनी सावधपणे पार्थ चॅटर्जींना बाजूला केले आहे. पण उद्धव ठाकरे मात्र पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अडकल्यानंतर संजय राऊत यांची पाठराखण करत आहेत. ते त्यांच्या घरी जाऊन आपण राऊतांच्या पाठीशी असल्याचे दाखवून देत आहेत. पण यामुळे फुटलेल्या शिवसेनेला ते कसे काय संजीवनी देऊ शकणार??, हा खरा प्रश्न आहे.

आदित्य आणि तेजस कडे धुरा

आता आदित्य आणि तेजस या दोन ठाकरे मुलांवर शिवसेनेची रस्त्यावरची धुरा देऊन ते मोकळे होत आहेत. हा देखील ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातला मोठा भेद आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूळ काँग्रेसची 100 % सूत्रे स्वतःच्या हातात ठेवली आहेत. अभिषेक बॅनर्जी यांचा अतिरिक्त हस्तक्षेप टाळला आहे. ही बाब येथे अधोरेखित केली पाहिजे.

 सत्ताकारणात ममता उद्धव पेक्षा सरस

शेवटी एक बाब निश्चित ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत वाढलेल्या नेत्या आहेत. राजकारणापेक्षा सत्ताकारण कसे खेळायचे हे उद्धव ठाकरे यांना यांच्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. ममता बॅनर्जींकडे भावनिक राजकारण खेळण्याचे कौशल्य तर आहेच, पण दरबारी राजकारणातही त्या अजिबात कमी नाहीत हेच त्यांनी आजच्या मंत्रिमंडळ फेरबदलातून सिद्ध केले आहे. उद्धव ठाकरे मात्र भावनिक राजकारणाच्या कोशातून बाहेरच पडायला तयार नाहीत. व्यावहारिक पातळीवर शिवसेनेतली फूट बुजवण्यासाठी ते कोणतीच उपाययोजना करताना दिसत नाहीत. हाही ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला भेद ठळकपणे दिसतो आहे!!

Mamata Banerjee made political damage control better than Uddhav Thackeray; made 9 nine new ministers after arrest of parth chatterjee

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!