शिवसेना : उद्धव ठाकरे घरात; काँग्रेसचे नेते शिवसेनेतर्फे सुप्रीम कोर्टात आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा वर्धनात!!


उद्धव ठाकरे घरात, काँग्रेसचे नेते शिवसेनेतर्फे सुप्रीम कोर्टात आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा वर्धनात!!, अशी आज 3 ऑगस्ट 2022 रोजीची शिवसेना नावाच्या पक्षाची राजकीय अवस्था आहे. Uddhav Thackeray still remains in matoshree, Congress lawyers are fighting for Shivsena in Supreme Court and eknath shinde is engaged in his own image building

शिवसेनेत उभी फूट पडली. 55 पैकी 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडून निघून गेले. पण उद्धव ठाकरे वर्षातून जे मातोश्रीत गेलेत ते अजून मातोश्री बाहेर पडलेले नाहीत. खासदार अरविंद सावंत यांचा सार्वजनिक कार्यक्रमाचा एक अपवाद वगळता आजही मातोश्रीतून सगळी सूत्रे हलवत आहेत. काल ते संजय राऊत यांच्या मातोश्रींना भेटायला भांडुपच्या घरी गेले होते. आणि शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी ते फायर आजीला भेटायला गेले होते. हे अपवाद वगळता उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडलेले नाहीत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना भेटत नव्हते. ते घराबाहेर पडतच नव्हते, अशा तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी केल्या. ते ठाकरे गटातून निघून गेले पण या तक्रारींवर कोणतीही उपाययोजना अजून झालेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी आदित्य ठाकरे हेच निवडक ठिकाणी बाहेर पडलेले दिसत आहेत आणि त्यांनी निवडक शक्तिप्रदर्शन केले आहे. यापेक्षा ठाकरे गटातून सामनाच्या रोजच्या अग्रलेखाशिवाय किंवा दोन-तीन नेत्यांच्या प्रतिक्रियांशिवाय कोणतेही राजकारण घडताना दिसत नाही. उद्धव ठाकरे मातोश्रीत बसत असल्यामुळे त्यांचा गट आजही मातोश्री भोवतीच शक्तिप्रदर्शन करत फिरतो आहे.

ठाकरेंची कायदेशीर लढाई काँग्रेसच्या खांद्यावर

दुसरीकडे शिवसेनेची सुप्रीम कोर्टातली कायदेशीर लढाई काँग्रेसचे दोन नेते अग्रभागी होऊन लढताना दिसत आहेत. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनोज सिंघवी हे शिवसेनेचे वकील सुप्रीम कोर्टात किल्ला लढवत आहेत. कपिल शब्द सध्या काँग्रेसमध्ये नाहीत ते समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत पण त्यांची मूळ पार्श्वभूमी काँग्रेसचीच आहे हे विसरून चालणार नाही.

अधिक शिरोडकर यांचा अभाव

एक काळ असा होता कट्टर शिवसैनिक आणि प्रख्यात वकील अधिक शिरोडकर आणि त्यांची फौज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत लढवत असे आणि जिंकतही असे. शिरोडकर यांच्या निधनानंतर आज शिवसेनेत त्यांच्यासारखा निष्णात कायदे पंडित उरलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेस नेत्यांच्या वकिली चतुराईचा वापर करावा लागतो आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला हा फार मोठा भेद आहे, ज्याविषयी फारशी कोणी चर्चा करत नाही!! बाळासाहेबांच्या वेळी अधिक शिरोडकर, चंद्रिका केनिया यांनी शिवसेनेला कधी अपयश येऊ दिले नाही. उद्धव ठाकरे यांचे काँग्रेसनिष्ठ वकील आता सुप्रीम कोर्टात युक्तिवाद तर करत आहेत पण त्यांच्या यशाची हमी कोण देणार??, हा खरा प्रश्न आहे.

शिंदेंचे दोन्ही वकील हिंदुत्वनिष्ठ

तिसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सुप्रीम कोर्टातली लढाई हरिश साळवे आणि महेश जेठमलानी हे लढत आहेत. ज्यांची मूळातच राजकीय पार्श्वभूमी हिंदुत्ववादाची आहे. महेश जेठमलानी यांचे वडील राम जेठमलानी हे देखील प्रख्यात कायदे पंडित होते आणि त्यांनी देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बाजू अनेकदा सुप्रीम कोर्टापर्यंत लढवली होती. राम जेठमलानी हे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केंद्रीय कायदेमंत्री होते. ते त्यांचे चिरंजीव महेश जेठमलानी आणि मोदी सरकारची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये मांडणारे हरिश साळवे हे एकनाथ शिंदे गटाचे वकील आहेत. ही गोष्ट बरीच राजकीय दृष्ट्या “बोलकी” आहे. कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदेंनी हिंदुत्ववादी वकिलांवर आपली भिस्त ठेवली आहे.

सामान्यांचा मुख्यमंत्री प्रतिमावर्धनावर भर

त्याचवेळी त्यांनी गेल्या महिन्याभरात स्वतःचे मुख्यमंत्री म्हणून प्रतिभावर्धन करण्यावर भर दिला आहे. सततच्या भेटीगाठी, जिथे असतील तिथून जनसामान्यांसाठी फोन, प्रसंगी विमान पाच मिनिटे थांबून फोन, लीलाधर डाके, मनोहर जोशी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्यांच्या भेटीगाठी, त्यांचे आशीर्वाद इतकेच नाही तर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे, जुने मित्र भाजपचे खासदार गिरीश बापट यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटणे यातून एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री पदाचे प्रतिमा वर्धन करत आहेत. जनसामान्यांचा मुख्यमंत्री ही स्वतःच ठरवलेली प्रतिमा ते जनतेच्या मनावर ठसवू इच्छित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडतच नव्हते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घरात परत येतच नाहीत, अशी स्थिती आहे. त्यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा दौरा करायचे ठरवलेले दिसत आहे. अर्थात या गोष्टीचा त्यांना राजकीय लाभ किती होतो?, हे नजीकच्या भविष्यात दिसून येईल. पण त्यांचे प्रतिमावर्धनाचे प्रयत्न मात्र निश्चित महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पातळीवर दखल घ्यायला लावणे भाग पाडणारे आहेत!!

Uddhav Thackeray still remains in matoshree, Congress lawyers are fighting for Shivsena in Supreme Court and eknath shinde is engaged in his own image building

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात