प्रतिनिधी
नाशिक : Dada Bhuse उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी दिल्लीमध्ये सरहद संस्थेकडून महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मात्र, यावरून ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या या पुरस्कारवर टीका केली आहे. यावर तू असाच जळत रहा, एवढेच मी बोलेन, अशी टीका शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.Dada Bhuse
दादा भुसे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अथक कष्ट करत शून्यातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने दिल्ली येथे शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या गोष्टीचा महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे.
पुढे दादा भुसे म्हणाले, परंतु काही लोकांच्या पोटात कायमचा गोळा आहे. एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व एकत्र असतानाही त्यांच्या पोटात गोळा होता, रोज त्यांची मळमळ बाहेर येते. हे भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी करतात शरद पवारांची. मात्र एकनाथ शिंदे यांचा त्यांनी गौरव केला तरी यांच्या पोटात पुन्हा गोळा उठला. यांच्याबद्दल न बोललेले बरे. तू असाच जळत रहा, एवढेच मी बोलेन, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर दादा भुसे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली अशा लोकांच्या सन्मानासाठी पवारांनी जायला नको होते, अशा शब्दात संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली. केवळ टीका करूनच संजय राऊत थांबले नाहीत तर दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनालाच त्यांनी दलालांचे संमेलन ठरवून टाकले. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कोणाचाही सन्मान केला जातोय हा मराठीचा घोर अपमान असल्याचे राऊत म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App