कोरोना आजार नाही तर मानसिक रोग, भिडे गुरुजी यांचे वादग्रस्त विधान


कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले  आहे.  Controversial statement of Bhide Guruji, corona is nit disease but mental illness

विशेष प्रतिनिधी
सांगली : कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले  आहे.
सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडेगुरुजी सहभागी झाले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही.
मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे. मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्‍न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही.
भिडे गुरुजी यांच्या या विधानावर टीका होत आहे.लोकांनी बंड करावे असे आवाहन त्यांनी केले असल्याबद्दल कारवाईची मागणीही होत आहे.

Controversial statement of Bhide Guruji, corona is nit disease but mental illness

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात