प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसश्रेष्ठींनी पुणे जिल्ह्यातल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित केले असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील चर्चेनंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक याच पावसाळी अधिवेशनात घेण्याचा निर्णय झाला असल्याचे बोलले गेल्यानंतर संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा पुढे आली. congress MLA sangram thopate`s name is on the forefront for maharashtra assembly speaker post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले. ते शरद पवारांना आवडले नव्हते. पण त्यांना तो निर्णय स्वीकारावा लागला होता. आता दुसऱ्या नेत्याला त्यातही पुणे जिल्ह्यातील संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्याचे काँग्रेसमध्ये घाटत आहे. पवारांच्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणात थोपटे “बसत” नाहीत. कारण ते पवारांचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत. पण कदाचित त्यामुळेच संग्राम थोपटे यांचे नाव काँग्रेसने निश्चित करून ते पवारांना स्वीकारणे भाग पाडत असावे.
Congress Toolkit Leak : संबित पात्रांनी पुराव्यानिशी सांगितले कोणी बनवली टूलकिट! काँग्रेसने भ्रम पसरवल्याचा आरोप
संग्राम थोपटे यांनी काल महसूलमंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. त्यांच्यात एक बैठकही झाली होती. त्या बैठकीस उपस्थित असलेल्या दुसऱ्या आमदाराने संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे निश्चित झाल्यानंतर विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार व नितीन राऊत यांची नावे पुढे आली होती. विधानसभा अध्यक्षपदी यापैकी एकाची नियुक्ती करून त्यांचे मंत्रिपद पटोले यांना दिले जाईल, अशी चर्चा होती. पण, त्यामुळे पक्षात बरेच फेरबदल करावे लागले असते म्हणून काँग्रेसश्रेष्ठींनी हे फेरबदल करण्याचे टाळल्याचे सांगितले जात आहे. त्याऐवजी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची या पदासाठी निवड केल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App